भारतीय शिक्षण संस्था अमृत मोहोत्सव 10 जानेवारी पासून प्रारंभ

भारतीय शिक्षण संस्था अमृत मोहोत्सव 10 जानेवारी पासून प्रारंभ

आधुनिक केसरी न्यूज 

नवरगाव : स्थानिक भारतीय शिक्षण संस्थेच्या स्थापनेला या वर्षी पंचाहत्तर वर्ष पूर्ण होतं आहेत, त्याचे औचीत्य साधून 2025 हे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरा करण्याचे संस्थेचे ठरविले आहे.  सदर अमृत महोत्सवाचा उदघाट्न सोहळा तसेच संस्थापक अध्यक्ष स्व. बालाजी पाटील बोरकर यांचा स्मृती सोहळा येत्या 10 आणि 11 जानेवारी ला भारत विद्यालय नवरगावच्या  भव्य पटांगणावर संपन्न होणार असून शुक्रवार दिनांक 10 जानेवारी ला दुपारी 12 वाजता,  नागपूरचे जेष्ठ साहित्यिक तथा श्रेष्ठ वक्ते प्रा. डॉ. कुमार शास्त्री हे सदर सोहळ्याचे उदघाटन करतील तर जेष्ठ विधिज्ञ ऍड. मधुकरराव निकुरे कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवतील. सदर कार्यक्रमात अमृत महोत्सवाच्या लोगोचे आणि नूतन वर्षाच्या दिनदर्शिकेचे विमोचन तसेच  स्व. बालाजी पाटील बोरकर स्मृती ' जीवन गौरव पुरस्कार ' प्रदान करण्यात येणार आहे. ह्याच दिवशी सायंकाळी 7 वाजता अकोल्याचे जेष्ठ रंगकर्मी  डॉ. रमेश थोरात  यांचा एकपात्री प्रयोग ' यहा हसना मना है ' तसेच रात्री 8 वाजता अद्वैत अमरावती निर्मित आणि विशाल तराळ दिग्दर्शीत चित्रांगदा ही मराठी प्रायोगिक एकांकिका सादर केली जाणार आहे. शुक्रवार दिनांक 11 जानेवारी ला सकाळी 8 वाजता हजारो विद्यार्थ्यांसाठी  तारे जमी परं  ह्या बालचित्रकलेचं आयोजन तसेच 9 वाजता महाविद्यालयीन विध्यार्थ्यांसाठी *आत्मभान* ही स्पर्धा परीक्षा आणि दुपारी 12 वाजता सर्व घटक संस्थेतील विद्यार्थांचा नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे.  त्याचं दिवशी सायंकाळी 7 वाजता सुप्रसिद्ध गायक गुणवंत घडवाई आणि मंजिरी वैद्य अय्यर यांचा नाट्यसंध्या हा नाट्यगीतांचा सुमधुर कार्यक्रम सादर होईल. सर्व कार्यक्रमांचा आस्वाद घेण्यासाठी नागरिकांनी उपस्थित रहावे अशी विनंती भारतीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयंत बोरकर, सचिव सदानंद बोरकर आणि संचालक मंडळाने केलेली आहे.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

सिडीसीसी बँकेवर सायबर हल्ला, ३ कोटी ७० लाखांवर मारला डल्ला सिडीसीसी बँकेवर सायबर हल्ला, ३ कोटी ७० लाखांवर मारला डल्ला
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर : दि. 13 रोजी नौकर भरती च्या निमित्ताने गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत असलेल्या चंद्रपूर जिल्हा...
आनंदवन हे ख-या अर्थाने मानवतेचे मंदीर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
माजी मुख्यमंत्रीयांच्या वाढदिवसानिमित्त जनसंपर्क अभियान डॉ.शशिकांत खेडेकर यांचा स्तुत्य उपक्रम 
लोकार्पित झालेली अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचे नवीन दालन ठरेल : आ.किशोर जोरगेवार
केंद्रीय अर्थसंकल्पावर बी.एन.एन. महाविद्यालयात चर्चासत्र संपन्न
चंद्रपूरच्या विधी क्षेत्राने मानले आ.सुधीर मुनगंटीवार यांचे आभार
साईबाबा संस्थानच्या दोन कामगाराचा खुन करणारे दोन आरोपी जेरबंद