पाचव्यांदा निवडून आलेले भाजपा आ डॉ.संजय कुटे यांचे ना देवेंद्र फडणवीस यांचेकडून कौतुक..!

पाचव्यांदा निवडून आलेले भाजपा आ डॉ.संजय कुटे यांचे ना देवेंद्र फडणवीस यांचेकडून कौतुक..!

आधुनिक केसरी न्यूज 

जळगाव जा : भाजपा नेते आ डॉ.संजयभाऊ कुटे हे स्वतः पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले.मतदार संघात कुठल्याही बड्या नेत्याची सभा घेतली नाही.स्वतःच प्रचाराची धुरा सांभाळून स्वतःसह पश्चिम वर्हाडातील महायुतीच्या उमेदवारांनाही निवडून आणले.पश्चिम वर्हाडात महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी सुक्ष्म नियोजन  केले.व पश्चिम वर्हाडातील महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या ऐतिहासिक विजय मिळविला.आज भाजपचे दिग्गज नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेऊन त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी जळगांव जामोद विधानसभा मतदारसंघातून सलग ५ वा विजय मिळवल्याबद्दल यथोचित सन्मान करून शुभेच्छा दिल्या.
महायुतीने राज्यात केलेली लोककल्याणकारी विकासकामे आणि मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या समर्थ नेतृत्वावर व्यक्त केलेल्या विश्वासाचे हे यश आहे.मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह महायुतीच्या प्रत्येक लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यानी केलेल्या कष्टातून हे यश मिळाले आहे. महायुती सरकारने आणलेल्या 'लाडकी बहीण'सारख्या अनेक जनहिताच्या योजनांना पाठींबा देत मतदारांनी महायुतीच्या उमेदवारांना भरभरुन मतदान केले, यासाठी महाराष्ट्राच्या जनतेचे मनःपूर्वक आभारही यावेळी महायुतीच्या वतीने प्रदेश पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले डाॅ संजय कुटे यांनी मानले.यावेळी आ डॉ.संजय कुटे यांचे स्वीय सहायक निलेश शर्मा पण सोबत होते.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

मंदिर परिसरातील भू-संपादन अखेर यशस्वी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने दुकानदारांना मिळणार मालकी हक्काची जागा..! मंदिर परिसरातील भू-संपादन अखेर यशस्वी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने दुकानदारांना मिळणार मालकी हक्काची जागा..!
आधुनिक केसरी न्यूज  शेगांव : दि. १४ येथील मंदिर परिसरातील बहुप्रतिक्षित भू-संपादनाची प्रक्रिया अखेर दुसऱ्या दिवशी शांततेत आणि यशस्वीरीत्या पूर्ण...
‘लाडकी बहिण’ योजनेवर सत्तेतील सावत्र भावांचा ३५०० कोटी रुपयांचा दरोडा; सरकार आहे की दरोडेखोरांची टोळी : हर्षवर्धन सपकाळ
नामांकित कोचिंग क्लासेस संचालकाची आत्महत्या..!
महाबळेश्वरमध्ये भिगवणच्या तरुणाचा निघृण खून; चार आरोपींना बेड्या..!
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात मध्यरात्री भुकंपाचे सौम्य धक्के 
भोकरच्या कचरा डेपो वर बिबट्याचा वावर..!
वेदांत बंडगर खुनातील संशयितांना 'मोक्का' एका अल्पवयीन मुलासह ९ जणांचा समावेश