काँग्रेसने शब्द पाळला; आरक्षण हटवले ; बँकेच्या जाहिरातीतून आरक्षण केले गायब

आधुनिक केसरी न्यूज 

प्रेम गेहलोत

बल्लारपूर - बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष रावत यांनी राहुल गांधी यांच्या मनसुब्यांवर तातडीने अंमलबजावणी करत राज्यघटनेतील अधिकारांचे हनन केले आहे. काही दिवसांपूर्वी खासदार राहुल गांधी यांनी आरक्षण हटविण्याचा उद्देश जाहीर केला होता. त्यावर ‘चट मंगनी पट ब्याह’प्रमाणे तिकडे शब्द दिला आणि इकडे पाळला, अशी कृती काँग्रेसने केली आहे. काँग्रेसची सत्ता असलेल्या चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेच्या जाहिरातीतून आरक्षण खरच गायब करण्यात आलं आहे. घटनेविरोधी कृत्याबद्दल रावत दोषी असून आता त्यांच्या विरोधात जनभावना उफाळून आली आहे.*

चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष काँग्रेसचे नेते संतोष सिंह रावत यांच्या नेतृत्वात हा निर्णय घेण्यात आला आहे. ते स्वतः बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्यांच्याच नेतृत्वात बँकेच्या जाहिरातीतून आरक्षण गायब करण्यात आले आहे, हे स्पष्ट आहे. 

बँकेतील लिपिक व शिपायाच्या पदासाठी 388 जागा रिक्त आहेत. उमेदवार पदवीधर असणे अनिवार्य आहे. पण यामध्ये आरक्षणाचा कॉलमच देण्यात आलेला नाही. त्यामुळे लोकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विविध सामाजिक संघटनांनी या प्रकरणाचा तीव्र विरोध करत जिल्हा बँक आणि काँग्रेस नेतृत्वावर गंभीर आरोप केले आहेत. आरक्षण हा घटनेने दिलेला हक्क आहे आणि तो हटवून काँग्रेसने थेट संविधानाचा अपमान केला आहे, अशी आक्रमक भूमिका संघटनांनी घेतली आहे. 

काँग्रेसच्या नेतृत्वातील चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या ताज्या भरती जाहिरातीमधून आरक्षण हटवून  संविधानविरोधी पाऊल उचलले आहे. या प्रकारामुळे काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा पुन्हा एकदा उघड झाला आहे. आरक्षणासारख्या घटनेने दिलेल्या हक्कावर गदा घालून काँग्रेसने केवळ सामाजिक अन्यायाचाच नाही तर संविधानाच्या पायावरच प्रहार केला आहे, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच गांधी चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष..! देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच गांधी चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष..!
आधुनिक केसरी न्यूज  चंद्रपूर : देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. याचे थेट प्रक्षेपण गांधी चौकातील...
सुप्रसिद्ध कवयित्री पद्मरेखा धनकर आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी यांना मसापचा सुनीताबाई गाडगीळ स्मृती साहित्य पुरस्कार
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात  भूकंपाचे धक्के..!
Braking News : बिंग फुट नये म्हणूनच मारकडवाडीत मतपत्रिकेवर मतदान घेण्यास प्रशासनाने मज्जाव...
आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.
लाडक्या बहीनीसह दाजीला बॅक खात्यात कधी पैसे पडणार याची चिंता 
शरद पवारांचा गंभीर आरोप....शेवटच्या तासात वाढलेली मतदानाची टक्केवारी धक्कादायक