भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत उद्या आमदार किशोर जोरगेवार दाखल करणार नामांकन अर्ज

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत उद्या आमदार किशोर जोरगेवार दाखल करणार नामांकन अर्ज

आधुनिक केसरी न्यूज 

चंद्रपूरचे : अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. उद्या ते भाजप महायुतीचे उमेदवार म्हणून नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ना. सुधीर मुनगंटीवार, आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची प्रमुखतेने उपस्थिती राहणार आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांना भाजप तर्फे महायुतीची उमेदवारी देण्यात आली असून आता ते भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणुकीला समोर जाणार आहेत. "जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेच, आता भाजपची साथ मिळाल्याने चंद्रपूरातील विकासकामे आणखी गतीशील करण्यात मदत होईल," असे आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी म्हटले आहे.

उद्या सोमवारी दुपारी १२ वाजता आमदार किशोर जोरगेवार यांच्या गांधी चौक येथील कार्यालयाजवळून भव्य रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचल्यानंतर आमदार किशोर जोरगेवार नामांकन अर्ज दाखल करतील. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

मुबंईवरून निघालेल्या खासगी बसचा सोलापूर जवळ भीषण  अपघात; सोलापूर पुणे महामार्गावर वाहनांच्या लागल्या किलोमीटरपर्यंत रांगा मुबंईवरून निघालेल्या खासगी बसचा सोलापूर जवळ भीषण  अपघात; सोलापूर पुणे महामार्गावर वाहनांच्या लागल्या किलोमीटरपर्यंत रांगा
आधुनिक केसरी न्यूज महेश गायकवाड   सोलापूर : महामार्गावर एका खासगी बसचा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नाही.मुंबईवरून...
भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक एसीबीच्या जाळ्यात; हद्द कायम प्रकरणी ३० हजारांच्या लाचेची केली मागणी
चंद्रपूर भाजप महानगर जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार यांची पदावरून हकालपट्टी
चंद्रपूर मनपा निवडणुकीच्या उमेदवारी वाटपावरून भाजपामध्ये घमासान तर काँग्रेसमध्ये शीतयुद्धाचे पडसाद,निष्ठावंतांना डावलले,  आयारामांचे  स्वागत
शासकीय कृषी तंत्र विद्यालय जळगाव जिल्हा क्रीडा निवड चाचणी स्पर्धा उत्साहात संपन्न
वारांच्या वार प्रतिवारामध्ये वारांचा वारांनाच आशीर्वाद
लोह्यातील तीन दुकानास लागली आग; आगीत लाखोचे नुकसान