जायकवाडी तुडुंब भरले ; धरणाचे सहा दरवाजे 0.5 फुटाने उघडले  ; गोदावरी पात्रात 3144 क्युसेकने विसर्ग 

जायकवाडी तुडुंब भरले ; धरणाचे सहा दरवाजे 0.5 फुटाने उघडले  ; गोदावरी पात्रात 3144 क्युसेकने विसर्ग 

आधुनिक केसरी न्यूज  

दादासाहेब घोडके.

पैैठण : दि. 09-09-2024 रोजी सकाळी ठिक 06.00 वा. जायकवाडी प्रकल्प (नाथसागर जलाशय) 97.30%* क्षमतेने भरला असून पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसाच्या पाण्याची आवक व उर्ध्व भागातील धरणांमधुन येणारी आवक बघता  दि. 09-09-2024 रोजी ठिक 12:40  दरम्यान जायकवाडी धरणाच्या सांडव्याद्वारे गोदावरी नदी पात्रात 3144 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला.
 जायकवाडी धरणाच्या एकुण 27 दरवाज्या पैकी अनुक्रमे असे  10,27,18,19,16,21 एकुण साहा दरवाजे  प्रत्येकी 0.5 फुटाने उघडण्यात आले. असुन एकूण 3144   अधिक्षक अभियंता सबिनवार यांच्या हस्ते  धरणाच्या दरवाजे पुजन करून विसर्ग करण्यात आला.
धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल.
तरी कुणीही गोदावरी नदीपात्रात प्रवेश करू नये व कुठलीही जिवीत व वित्त हानी होऊ नये या करिता नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी,  असे आवाहन स्थानिक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

महिला किर्तनकार यांचे हत्येचा गुन्हा उघडकीस; दोन आरोपी जेरबंद..! महिला किर्तनकार यांचे हत्येचा गुन्हा उघडकीस; दोन आरोपी जेरबंद..!
आधुनिक केसरी न्यूज वैजापूर : दि.२७ जून रोजी पोस्टे विरगांव हददीतील मौजे चिंचडगाव शिवारात शेत गट नंबर ५९ मध्ये असलेल्या...
वसमत मध्ये काॅंग्रेसला धक्का; डॉ.क्यातमवार शिंदे सेनेत सामील
अजित पवारांनी विरोधकांचा असा घेतला समाचार..!
राज्यात वीज पडून मृत झालेले शेतकरी, शेतमजूर यांना १० लाख रुपयांची मदत देण्यात यावी ; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांची मागणी..!
शक्तिपीठ महामार्गाच्या प्रकल्पासाठी पैसे दिले जातात ,पण शेतकरी कर्जमाफीसाठी पैसे नाही का?
अंबाडी घाटात बस व बोलेरो च्या भीषण अपघातात एक ठार
नरेंद्र मोदी भाजपा व बबनराव लोणीकरांचे बाप असू शकतात शेतकऱ्यांचे नाही: नाना पटोले