जीवावर उदार होत पकडला शिर्डीत विषारी नाग
On
आधुनिक केसरी न्यूज
शिर्डी : शिर्डी शहरात असलेल्या द्वारकानगर परिसरातील दत्तात्रय वामन कोते यांच्या घरी रविवार दिनांक ४ ऑगस्ट रोजी दुपारी घरात भला मोठा नाग असल्याचे लक्षात येतात घरात मोठी तारांबळ उडाली मात्र सर्पमित्र संदीप खिरे यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊ पाच फूट लांबीचा कोब्रा जातीचा नाग सीताफिने ताब्यात घेऊन जंगलात सोडून दिला
पावसाळी वातावरण असल्याने विषारी बिनविषारी साप किंवा नाद भक्ष्याच्या शोधात बाहेर पडतात अशावेळी ज्या ठिकाणी मोठी दाटीवाटी किवा बेडूक किवा पाल असे भक्ष मिळु शकतात अशा ठिकाणी हे साप शोधात फिरत असतात सध्या पावसाळी वातावरण असल्याने अशा काळात विषारी बिनविषारी साप मोठ्या प्रमाणावर दिसून येतात त्यामुळे नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे असे आवाहन खिरे यांनी केले आहे
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
21 Dec 2025 20:31:41
रिसोड: तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागलेल्या निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला आहे. अतिशय चुरशी समजली जाणारी निवडणुक रिसोड नगर परिषदेवर भाजपचे...

Comment List