मानवतेचा पूजक हरपला : विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते , सरचिटणीस विलास मानेकर
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे मराठी साहित्यातील एक महत्त्वाचे लेखक होते.मराठी साहित्यातील संतवचनांचा त्यांचा अभ्यास होता. सर्वधर्मसमभावाचे ते प्रणेते होते तसेच, ख्रिश्चन मराठी साहित्याचे अध्वर्यू होते.साहित्य क्षेत्रात त्यानी स्वतःचे एक स्थान निर्माण केले होते .मानवता जपणाऱ्या संवेदनशील फादर दिब्रिटो यांच्या लेखी सर्व धर्म सामान होते..पर्यावरण रक्षणासाठी त्यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. धाराशिव येथे २०२० साली झालेल्या ९३ व्या अखिलभारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. ५ नोव्हेम्बर २०१९ रोजी विदर्भ साहित्य संघाने त्यांचा सत्कार केला होता. विदर्भ साहित्य संघाचे आणि त्यांचे जुने ऋणानुबंध होते .त्यांच्या निधनाने मानवतेचा पूजक हरपला आहे. या शब्दात विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते आणि सरचिटणीस विलास मानेकर यांनी फादर दिब्रिटो यांना श्रद्धांजली अर्पण केली.
Comment List