धक्कादायक अज्ञात व्यक्तीने गोळीबार करत केली युवकाची हत्या
On
आधुनिक केसरी न्यूज
राजुरा : दि,२३/७/२०२४ नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील पंचायत समिती जवळ असलेल्या बॅक ऑफ महाराष्ट्र समोर अज्ञात व्यक्तीने गोळीबार करीत एका युवकाची हत्या केल्याची घटना आज दिनांक 23 जुलैला सायंकाळ ला 7 वाजताच्या सुमारास घडली. शिवज्योत सिंघ देवल ( वय 28 वर्षे ) रा. राजुरा असे मृतकाचे नाव असल्याची कळते. गोळीबार करून आरोपी फरार झाले असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.
चंद्रपूर मध्ये काही दिवसांपूर्वी शहराच्या मध्यभागी सुद्धा असाच गोळीबार झाला होता.गेल्या काही महिन्यांपासून चंद्रपूर जिल्ह्यात गोळीबाराच्या घटनेत वाढ झाली असून यामुळे पोलिसांसमोर हे एक मोठेच आवाहन उभे ठाकले आहे . शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे .
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
28 Oct 2025 20:50:12
आधुनिक केसरी न्यूज मुंबई : नांदेड, दि. २८ ऑक्टोबरअतिवृष्टी व महापूरामुळे झालेल्या नुकसानीपोटी महायुती सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. सरकारने...

Comment List