एकाच वेळी सात जणांना अग्निदाह ; वारकऱ्यांचे अपघाती निधन ; चनेगाव,तपोवन ,खामखेडा गावांवर शोककळा

जनसमुदाय गहिवरला,गावात चूल पेटली नाही

एकाच वेळी सात जणांना अग्निदाह ; वारकऱ्यांचे अपघाती निधन ; चनेगाव,तपोवन ,खामखेडा गावांवर शोककळा

आधुनिक केसरी न्यूज 

प्रा.बाळासाहेब बोराडे

श्रीक्षेत्र राजूर: जालना-राजुर महामार्गावर वसंतनगर जवळ 18 जुलै रोजी दुपारी पाचच्या सुमारास आषाढी वारीहून घरी परतत असताना काळीपिवळी टॅक्सी रस्त्यालगतच्या विहरित पडून सात वारकऱ्यांचा मृत्यू झाला होता.त्यामुळे चनेगाव,तपोवन ,खामखेडा या गावांवर शोककळा पसरली होती. दिनांक 19 जुलैला सकाळी शोकाकुल वातावरणात मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.एकाच वेळी सात जणांना अग्निदाह देतांना उपस्थित शोकाकुल जनसमुदाय गहिवरला होता.यावेळी नातेवाईकांसह ग्रामस्थांना अश्रूं अनावर झाले होते.दुःखद घटना घडल्याने गावांत चूल पेटली नाही. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाखांची मदत देणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
 
आठरा जुलै रोजी दुपारच्या वेळी आषाढी वारीहून घरी परतत असतांना  राजूर-जालना महामार्गावर वसंतनगर जवळ काळी-पिवळी विहिरीत पडून सात वारकऱ्यांचा मृत्यू झाला होता यामध्ये बदनापूर तालुक्यातील चनेगाव येथील प्रल्हाद महाजन,नंदा तायडे,नारायण निहाळ,प्रल्हाद बिटले, चंद्रभागा घुगे यांचा तर भोकरदन तालुक्यातील तपोवन येथील ताराबाई मालुसरे व खामखेडा येथील रंजना कांबळे अशा एकूण सात जणांचा मृत्यू झाला होता.शुक्रवार रोजी सकाळी नातेवाईकांसह ग्रामस्थांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 अपघात घडल्यानंतर जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती.जखमींना उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले होते.तर मृतांचे शासकीय रुग्णालयात शेवविच्छेदन करण्यात आले होते.प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. 19 जुलै रोजी  सकाळी शोकाकुल वातावरणात मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी राजकीय, सामाजिक, व्यापारी,शैक्षणिक, क्षेत्रातील मान्यवर तसेच प्रशासकीय अधिकारी,कर्मचारी नातेवाईक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाखांची मदत देणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

डीपीच्या शॉर्टसर्किटने चार एकर ऊस जळून खाक डीपीच्या शॉर्टसर्किटने चार एकर ऊस जळून खाक
आधुनिक केसरी न्यूज  त्रिसिंग जायभाये  वडीगोद्री : अंबड तालुक्यातील दोदडगाव येथे विद्युत डीपीमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे शेतातील उभ्या ऊस पिकाला आग...
स्मशानभूमीच्या हक्कासाठी निपाणी सावरगावात सरणावर बसून आमरण उपोषण; आज सहावा दिवस, प्रशासनाची उदासीनता कायम
छत्रपती संभाजीनगरची इव्ही हब म्हणून जगात ओळख निर्माण करू : नवीनीकरण ऊर्जा मंत्री अतुल सावे
धनगर एसटी आरक्षण लढा तीव्र होणार! युवानेते दीपकभाऊ बोऱ्हाडे यांचे वझरगा येथे स्वागत; ३० ऑगस्ट रोजी नांदेड येथे महत्त्वपूर्ण बैठक
छत्रपती संभाजीनगरसाठी ‘विकासाचा रोडमॅप' ; सीएमआयए आणि सीएसएन फर्स्टने पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार संजीव सन्याल यांच्यासमोर मांडल्या मागण्या
अंतरवालीत पोलिसांचा मोठा बंदोबस्त; जरांगे पाटील आक्रमक
संत मुक्ताईंनी लाडक्या भाऊरायासाठी जन्मभूमी आपेगावी पाठवली राखी, अलौकिक रक्षाबंधन सोहळा संपन्न