जेसीबीच्या खोऱ्यात बसून गर्भवतीने ओलांडला नाला : आलापल्ली- भामरागड महामार्गावरील प्रकार
आधुनिक केसरी न्यूज
गडचिरोली : पावसामुळे नाल्यांना पूर आल्याने महामार्गाच्या बांधकामावरील जेसीबीच्या खोऱ्यात बसून एका गर्भवती महिलेला पैलतिरी जाण्याची वेळ आली. १९ जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास आलापल्ली- भामरागड महामार्गावर हा धक्कादायक प्रकार घडला.
त्यामुळे दुर्गम, अतिदुर्गम भागात सुविधांअभावी नागरिकांच्या नशिबी परवड कायम असल्याचे समोर आले आहे.
जेवरी संदीप मडावी (२२) रा कुडकेली ता. भामरागड जिल्हा गडचिरोली. असे महिलेचे नाव आहे. २७ जुलै रोजी तिची प्रसूतीची तारीख होती. मात्र, १९ जुलैलाच सकाळी प्रसववेदना सुरु झाल्या. त्यामुळे सुमदाय आरोग्य अधिकारी व परिचारिका रुग्णवाहिकेतून तिला भामरागड ग्रामीण रुग्णालयात घेऊन जात होत्या. वाटेत मोठा नाला लागला. १८ रोजी जोरदार पाऊस झालेला असल्याने या नाल्यातून पाणी वाहत होते, त्यामुळे रहदारी अशक्य होती. रुग्णवाहिका पुढे नेता येत नसल्याने शेवटी जेसीबीच्या खोऱ्यात महिला व तिच्या पतीला बसवून पैलतिरी सोडण्यात आले. आलापल्ली- भामरागड राष्ट्रीय महामार्गाचे (क्र. १३० डी) सध्या बांधकाम सुरु आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List