मुखेड तालुक्यात दोन दुचाकीच्या धडकेत १ ठार, ४ जखमी 

मुखेड तालुक्यात दोन दुचाकीच्या धडकेत १ ठार, ४ जखमी 

आधुनिक केसरी न्यूज 

संजय कांबळे

मुखेड : तालुक्यातील मौजे शिकारा पाटीजवळ राज्य महामार्गावर झालेल्या तीन वाहनांच्या अपघातात चार जण जखमी झाले तर एका कारचा झाल्याची घटना घडली. तसेच मुखेड शहरापासून काही अंतरावर असलेल्या कंधारफाटाजवळील राजेश धाब्यासमोर दोन दुचाकीची धडक झाल्याने या अपघातात एका २२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान एकाच दिवशी घडलेल्या दोन अपघातात एक ठार तर चार जखमी झाल्याची घटना मुखेड तालुक्यात घडली.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस (क्रमांक एम.एच.२० बी.एल. १२३२) शिरूर ताजवंदहुन मुखेडच्या दिशेने जात होती. तेव्हां शिकारापाटी येथे शाळेचे विद्यार्थ्यांना घेण्यासाठी बस त्याठिकाणी थांबली असता त्याचवेळी पाठीमागून येणारी शिफ्ट डिजायर कार (क्रमांक २६ बी.सी. ४५२२) ही गाडी बसच्या पाठीमागे आली तेव्हा शिफ्ट डिजायर कारच्या पाठीमागे, उदयगिरी ट्रॅव्हल्स (क्र. एम.एच.२४ एवी ७८७८) या ट्रॅव्हल्सने शिफ्ट डिजायरला जोराची धडक दिल्याने स्विफ्ट डिजायर कार बसच्या पाठीमागे घुसली. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. बस व ट्रॅव्हल्सच्या मध्ये कार ही गाडी चिरडल्याने कारचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये चार जण जखमी झाल्याची घडली आहे. त्याचबरोबर दुसऱ्या एका घटनेत मुखेड ते लातूर राज्य महामार्गावर कंधारफाटा जवळील राजेश धाब्याजवळ एक दुचाकी दुसऱ्या दुचाकीवर धडकल्याने एक महिला
घटनास्थळी ठार झाली. सदरील महिला ही मुखेड तालुक्यातील मौजे होनवडज येथील रहिवासी आहे. मयत महिलेचे नाव उमा शिवकुमार तलवारे (वय २२) असे आहे. सदर महिला भावासोबत वाहन (क्रमांक एम. एच.२६ एन.१३०२) या दुचाकीवर बसून वसंतनगर येथील महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी जात होती. तेव्हां लातूर रस्त्यावर घाव्याजवळ समोरील दुचाकी (क्रमांक एम. एच. २६ बी.एम.८५२४) दुचाकी अचानक थांबल्याने मागून येणारी दुचाकी घडकल्याने यात महिलेला जबर मार लागून जागीच ठार झाली आहे. यावेळी महिलेसोबत असलेला एक वर्षाचा मुलगा आईच्या अंगावर पडल्याने तो बचावला. सदरील महिलेस उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले डॉ. शुभम झाडे यांनी शवविच्छेदन केले. या प्रकरणाची पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

अंबाडी घाटात बस व बोलेरो च्या भीषण अपघातात एक ठार अंबाडी घाटात बस व बोलेरो च्या भीषण अपघातात एक ठार
आधुनिक केसरी न्यूज लक्ष्मीकांत मुंडे किनवट : तीर्थक्षेत्र उनकेश्वरकडून सकाळी किनवटकडे येणाऱ्या किनवट आगाराच्या बसगाडीची क्रं. एम. एच. ४१ -...
नरेंद्र मोदी भाजपा व बबनराव लोणीकरांचे बाप असू शकतात शेतकऱ्यांचे नाही: नाना पटोले
शेतकऱ्यांचा अपमान सत्ताधाऱ्यांनी केला, मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी विरोधकांची मागणी..!
शक्तीपीठ महामार्गाची सांगली जिल्ह्यात तिसंगी, विसापूर, शिरढोण येथे आज चौथ्या दिवशी मोजणी रोखली..!
म्हसवड पोलिसांची मोठी कारवाई; १८० लिटर देशी-विदेशी दारू जप्त
मुख्यमंत्र्यांनी  घेतली विश्वास मोहिते यांच्या तक्रारीची गंभीर दखल..!
धक्कादायक दौंडच्या स्वामी चिंचोली येथे पंढरपूरला निघालेल्या महिलांना लुटले अल्पवयीन मुलीच्या गळ्याला कोयता लावून अत्याचार..!