छत्रपती संभाजीनगरमध्ये बिबट्याची दहशत ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

छत्रपती संभाजीनगरमध्ये बिबट्याची दहशत ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

आधुनिक केसरी न्यूज 

छत्रपती संभाजीनगर : शहरात प्रमुख व गजबजलेल्या वसाहतीत सोमवारी पहाटे ३.३० च्या सुमारास बिबट्या सदृश प्राण्याचे दर्शन सीसीटिव्ही मध्ये कैद झाले. याला वनविभागाकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी स्थानिक रहिवाशांनी सीसीटिव्हीचे फुटेजचा आधार घेत तो बिबट्याच असल्याचा दावा केला आहे. उल्का नगरी या अत्यंत उच्चभ्रू वसाहतीतील साईशरण पेट्रोलपंप नजीकच्या खिंवसरा पार्कजवळच्या प्लॉट नं. ६४ च्या आसपास मोकळी जागा असून त्या भागात सुमारे ३०० झाडे आहेत. याच ठिकाणी झाडांआडून पळताना बिबट्या पळत आहे. या संदर्भात नगरसेवक दिलीप थोरात यांनी तो प्राणी बिबट्याच असून सुरुवातीला आम्हाला अफवा वाटली, पण सीसीटिव्ही फुटेज पाहता तो बिबट्याच असल्याचे दिसते, असे सांगितले. दरम्यान, या फुटेज समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

महिला किर्तनकार यांचे हत्येचा गुन्हा उघडकीस; दोन आरोपी जेरबंद..! महिला किर्तनकार यांचे हत्येचा गुन्हा उघडकीस; दोन आरोपी जेरबंद..!
आधुनिक केसरी न्यूज वैजापूर : दि.२७ जून रोजी पोस्टे विरगांव हददीतील मौजे चिंचडगाव शिवारात शेत गट नंबर ५९ मध्ये असलेल्या...
वसमत मध्ये काॅंग्रेसला धक्का; डॉ.क्यातमवार शिंदे सेनेत सामील
अजित पवारांनी विरोधकांचा असा घेतला समाचार..!
राज्यात वीज पडून मृत झालेले शेतकरी, शेतमजूर यांना १० लाख रुपयांची मदत देण्यात यावी ; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांची मागणी..!
शक्तिपीठ महामार्गाच्या प्रकल्पासाठी पैसे दिले जातात ,पण शेतकरी कर्जमाफीसाठी पैसे नाही का?
अंबाडी घाटात बस व बोलेरो च्या भीषण अपघातात एक ठार
नरेंद्र मोदी भाजपा व बबनराव लोणीकरांचे बाप असू शकतात शेतकऱ्यांचे नाही: नाना पटोले