सैनिकी प्रशिक्षण पूर्ण करून आलेल्या जवानाची ग्रामस्थांनी काढली मिरवणूक;अंभोडा कदम येथे बीएसएफ जवान केशव गोरे यांचे जंगी स्वागत 

सैनिकी प्रशिक्षण पूर्ण करून आलेल्या जवानाची ग्रामस्थांनी काढली मिरवणूक;अंभोडा कदम येथे बीएसएफ जवान केशव गोरे यांचे जंगी स्वागत 

 

 

IMG-20240609-WA0429

आधुनिक केसरी न्यूज 

प्रा. बाळासाहेब बोराडे

जालना : मंठा तालुक्यातील अंभोडा कदम येथील केशव रंजीत गोरे या युवकाने नुकतेच बीएसएफमधील सैनिकी प्रशिक्षण पूर्ण करून आल्यानंतर ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने ढोलताशांच्या गजरात घोड्यावर बसून मिरवणूक काढून जंगी  स्वागत केले.आपल्या गावात लहानाचा मोठा झालेला केशव वर्दी घालून आल्याचे ग्रामस्थांना कौतुक वाटत होते.ग्रामस्थांना सैनिकाबद्दल असलेला आदर पाहून केशवचेही मन भरून आले होते.एवढ्या मोठ्या जल्लोषात स्वागत केल्याबद्दल गोरे परिवाराने ग्रामस्थांचे आभार मानले.
 

केशव गोरे हा सामान्य शेतकरी कुटुंबातील तरुण आहे. त्याचे पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण मंठा येथील स्वामी विवेकानंद हायस्कूल मध्ये झाले.त्याला लहानपणापासूनच देशसेवेची आवड होती. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने सैन्यदलात जाण्याचे ठरविले होते.त्यासाठी त्याने छत्रपती संभाजीनगर व पुणे येथे खाजगी सैनिकी प्रशिक्षण संस्थेत सराव केला.आणि पहिल्याच प्रयत्नात तो बीएसएफमध्ये भरती झालाहोता.प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मागील सहा महिन्यांपासून पश्चिम बंगालमधील कच्छ बिहार जिल्ह्यात देशसेवेचे कर्तव्यने निभावत आहे.

केशव गोरे हा सैन्यात भरती झाल्यानंतर पहिल्यांदाच गावी आल्यावर ग्रामस्थांनी त्याची घोड्यावर बसून मिरवणूक काढली.महिलांनी केशव गोरेचे  जागोजागी औक्षण करून स्वागत केले.तरुणांनी भारत माता की जय ,वंदे मातरम, जय जिजाऊ जय शिवरायच्या घोषणा दिल्या.देशभक्तीपर घोषणाने परिसर दुमदुमला होता.संपूर्ण गावातील वातावरण देशभक्तीमय झाले होते.यावेळी ग्रामस्थ व तरुण मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.यथोचित सत्कार केल्याबद्दल गोरे परिवाराने ग्रामस्थांचे आभार मानले.

कठोर परिश्रमाने यश प्राप्त होते

मला बालपणापासून सैन्यात जाण्याची आवड होती.म्हणून मी हे क्षेत्र निवडले.अभ्यास व मैदानी चाचण्यांचा जिद्दीने  सराव केला.आणि पहिल्याच प्रयत्नात सैन्यांत भरती झालो. कठोर परिश्रमातून सैनिकी प्रशिक्षण पूर्ण केले.आज देश सेवेसाठी सज्ज झालो आहे. वर्दीचा मला सार्थ अभिमान आहे.अपयशाने खचून न जाता सतत प्रयत्न करत रहा.यश हमखास मिळते.ग्रामस्थांनी केलेला सन्मान आपण कधीही विसरणार नाही.

केशव गोरे, भारतीय सैनिक

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

आगमी विधानसभा निवडणूक सर्व ताकतिनिशी लढवणार ; सौ.आशाताई शिंदे आगमी विधानसभा निवडणूक सर्व ताकतिनिशी लढवणार ; सौ.आशाताई शिंदे
  आधुनिक केसरी न्यूज धोंडीबा मुंडे  कंधार : तालुक्यातील फुलवळ सर्कल मधील शेकापुर येथे काल दि.२३ जून रविवारी जनसंवाद बैठकीचे
बारुळ मानारचे पाणी उदगीर-जळकोटला घेऊन जाणाऱ्या पाईपलाईन योजनेचे काम शिवसेनेने पाडले बंद
नीटच्या परीक्षांमधील गोंधळावरून जयंत पाटलांंनी थेट मोदींना लगावला 'हा' टोला....सत्तेवर येताच क्रांतिकारी
लोह्यात अनोळखी इसमाचे प्रेत नदी पात्रात आढळले
भंडारदरा धरणात शिर्डी येथील एका तरुणाचा बुडून मृत्यू ; पाच जण बचावले
 देवेंद्र फडणवीसांनी पुराव्यासह 'असे' केले काँग्रेसचे तोंड बंद ; फेकन्यूज आणि फेक नरेटिव्हची जणू फॅक्टरीच...
वाकद ग्राम पंचायतला सरपंचासह सदस्यांनी लावले कुलूप