अपघाती मृत्यू झालेल्या सचिन नाईक यांच्या कुटुंबियांना पत्रकार संघाचा मदतीचा हात

अपघाती मृत्यू झालेल्या सचिन नाईक यांच्या कुटुंबियांना पत्रकार संघाचा मदतीचा हात

आधुनिक केसरी न्यूज 

माजलगाव : येथील तरूण पत्रकार सचिन नाईक यांच्या अपघाती निधनामुळे माजलगावकर उमद्या पत्रकाराला मुकले आहेत, अशा शब्दांत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या. 

बुधवार, १७ एप्रिल रोजी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी नाईक यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने नाईक यांच्या कुटुंबियांना त्यांचे वडील व बंधू यांच्याकडे अर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली. माजलगाव येथील तरूण पत्रकार सचिन नाईक यांचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले. सचिन नाईक हा कुटुंबातील कर्ता होता. त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती. आई - वडील वयोवृद्ध आहेत. नाईक कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सहभागी आहे. मदतीचा हात म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या पुढाकारातून मराठवाडा अध्यक्ष वैभव स्वामी, राज्य कार्यकारिणी सदस्य बाबा देशमाने, 
प्रा. सुदर्शन स्वामी, परमेश्वर सोळंके, किसन भदर्गे, रविकांत उघडे,संतोष जेथलिया यांनी सांत्वनपर भेट घेत आर्थिक मदत केली.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

“रांगांना पूर्णविराम! पोलीस बंदोबस्तात गॅस वितरण; घरपोच सेवा व OTPमुळे काळाबाजारावर आळा” “रांगांना पूर्णविराम! पोलीस बंदोबस्तात गॅस वितरण; घरपोच सेवा व OTPमुळे काळाबाजारावर आळा”
आधुनिक केसरी न्यूज  गडचिरोली जिल्ह्यात गॅस टंचाईमुळे एजन्सीसमोर लागणाऱ्या लांबलचक रांगांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व रोष निर्माण झाला होता. शासनाकडून...
शिळवणी येथे वीज पडून १६ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
विधानभवनात पत्रकारांच्या घरांच्या प्रश्नांवर बैठक; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तातडीने तोडगा काढण्याचे निर्देश
आडगाव येथे जखमी अवस्थेत हरणास दिले जीवनदान
चंद्रपूर मनपा स्थायी समितीच्या सभापतीपदी मनस्वी गिऱ्हे यांची निवड.
वरोड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा थरार ; बनावट दारूसह १२ लाखांच्या मुद्देमाल जप्त
अफवांमुळे एचपीव्ही लसीकरणाकडे पालकांची पाठ; जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जयश्री भुसारे यांची वाकुळणी येथे तपासणी