बिबट्याच्या पिलास मिळाले जीवदान

बिबट्याच्या पिलास मिळाले जीवदान

आधुनिक केसरी न्यूज 

भोकर : मागील दोन वर्षांपूर्वी जिरोणा (ता. हिमायतनगर) परिसरात शेतकऱ्यास आजारी असलेले बिबट्यांचे पील्लू  सापडले. वनविभागानी नागपूर येथे उपचार करून गुरुवारी ता. (चार) येथील वनविभागाकडे स्वाधीन केले आहे.मानद जीवरक्षकानी तपासणी केली असता तंदुरुस्त असल्याची खात्री झाल्याने नैसर्गिक आदिवासात सोडून दिले आहे. ‌वनविभाने दिलेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यात बिबट्या जातीचे वन्यजीव आश्रयाला असून त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी वनविभागिकडे  आहे.अधूनमधून ते शिकारीसाठी जंगल आणि मानवी वस्तीकडे फिरकतात. मागील दोन वर्षापुर्वी जिरोणा (ता.हिमायतनगर) नियतक्षेत्रवासी परिसरात शेतात कापूस वेचणी करताना एका शेतकऱ्यांला बिबट्या जातीचे दिड वर्ष वयाचे पिल्लू आढळून आल्याने त्यास हिमायतनगर वनविभागाने ७ नोव्हेंबर २०२२ रोजी भोकर वनविभागाकडे पाठवले.सदरील पील्ल्याच्या उजव्या पायास "पॅरिलेसीस आजार झाल्याचे स्पष्ट झाल्याने पुढिल उपचारासाठी नागपूर येथील व्याग्र व वन्य प्राणी उपचार केंद्रात दाखल करण्यात आले आहे. ऊपचारा नंतर तब्बल दोन वर्षांनी गूरूवारी त्या पीलास येथील वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले.मानद जीवरक्षक आतेंद्र कट्टी यांनी बिबट्याची तपासणी केली असता ते तंदुरुस्त असल्याची खात्री झाल्याने जिरोणा शिवारातील नैसर्गिक अधिवासात सोडून दिले आहे.
वनविगाने केले प्रयत्न  : सदरील आजारी बिबट्याच्या पिलास ऊपचार करण्यासाठी नांदेड येथील उपवनसंरक्षक केशव बाबळे, सहायक ऊपवन संरक्षक बी.एन.ठाकुर यांच्या  मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी प्रतिक मोडवान (भोकर), वनपरिक्षेत्र अधिकारी बालाजी चव्हाण (हिमायतनगर), वनपाल अमोल कदम(हिमायतनगर),वनपाल ज्ञानेश्वर धोंडगे (भोकर), नारायण गीते, सुभाष बालाजी आदिनी शर्थीचे प्रयत्न केले.
डॉक्टरामुळे मिळालं जीवदान : नागपूर येथील व्याघ्र व वन्य जीव उपचार केंद्रातील डॉक्टर कूंदन हाते, डॉक्टर सूदर्शन काकडे, डॉक्टर राजेश हूलसूंगे, डॉक्टर पंकज थोरात, डॉक्टर सिध्दांत मोरे याच्या निगराणीत त्या बिबट्याच्या पीलावर तब्बल दोन वर्षे उपचार केल्याने जीवदान मिळाले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

अंढेरा शिवारात जुळ्या मुलींची गळा चिरून निर्घृण हत्या, आरोपी पित्याने वाशीम पोलिसात केले आत्मसमर्पण अंढेरा शिवारात जुळ्या मुलींची गळा चिरून निर्घृण हत्या, आरोपी पित्याने वाशीम पोलिसात केले आत्मसमर्पण
आधुनिक केसरी न्यूज देऊळगाव राजा  : तालुक्यातील अंढेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक हृदय पिळवटून टाकणारी आणि संतापजनक घटना समोर आली...
दाजीपूर अभयारण्य सफारी अखेर सुरू! गोकुळचे संचालक अभिजीत तायशेटे यांच्या मागणीला यश
भिगवण मध्ये चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आला गर्भवती महिलेचा मृतदेह ; उडाली एकच खळबळ
भिगवण पोलिसांची दिपावलीपूर्वीची धडाकेबाज कारवाई! अट्टल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या, 1 लाख रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत
धक्कादायक : पोषण आहाराच्या पॅकेटमध्ये सापडला मेलेला उंदीर - देवरी तालुक्यातील अतिदुर्गम धवलखेडी येथील धक्कादायक प्रकार..!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंचाहत्तरीनिमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
लहान भावाच्या स्टेम सेल्स दानातून वाचले मोठ्या भावाचे प्राण