थेट रायगडावरुन  : सध्याचा काळ वैचारिक संघर्षाचा, पुन्हा जनतेचे राज्य आणू... शरद पवार काय म्हणाले वाचा सविस्तर 

थेट रायगडावरुन  : सध्याचा काळ वैचारिक संघर्षाचा, पुन्हा जनतेचे राज्य आणू... शरद पवार काय म्हणाले वाचा सविस्तर 

आधुनिक केसरी न्यूज 

रायगड  : ही तुतारी एका संघर्षाला सुरुवात करण्यासाठी प्रेरणा देणारी आहे. जनतेसाठी ही आनंदाची तुतारी असेल. राज्याची परिस्थिती बदलण्यासाठी जनतेचे राज्य आणावे लागेल, असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी रायगड किल्ल्यावर पक्षाच्या तुतारी चिन्हाच्या अनावरण प्रसंगी बोलताना म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज शनिवारी रोजी किल्ले रायगडावर तुतारी फुंकणारा माणूस या आपल्या नव्या निवडणूक चिन्हाचे अनावर केले. यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार अनिल देशमुख, आमदार राजेश टोपे, खासदार फौजीया खान, खासदार अमोल कोल्हे, माजी खासदार वंदना चव्हाण,  आमदार सुनील भुसारा, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार अशोक पवार, आमदार सुमन पाटील यांच्यासह पक्षाचे व फ्रंटल सेलचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले की, सध्याचा संघर्ष हा वैचारिक आहे. या देशात अनेक राजे झाले, संस्थानिक झाले. परंतु, रयतेचा राजा एकच झाला. सध्या राज्यात अडचणी वाढतील अशी स्थिती आहे. शिवछत्रपतींचे राज्य सामान्यांची सेवा करणारे राज्य होते. आज महाराष्ट्राची स्थिती बदलायची असेल तर पुन्हा एकदा याठिकाणी जनतेचे राज्य येईल, यासाठी प्रयत्न करावे लागतील. निवडणूक आयोगाने रणशिंग फुंकायला तुतारी दिली आहे. संघर्षातून प्रेरणा देणारी ही तुतारी आहे. तुमच्या संघर्षातून, त्यागातून यश मिळणार याची खात्री आहे. या ऐतिसाहिक भूमीत आपण आलो आहोत. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन, या ठिकाणाहून प्रेरणा घेऊन जनतेची सेवा करुया, असेही शरद पवार यांच्याकडून सांगण्यात आले.

पुढे पवार  म्हणाले की, निवडणूक आयोगाने रणशिंग फुंकायला तुतारी दिली आहे. संघर्षातून प्रेरणा देणारी ही तुतारी आहे. तुमच्या संघर्षातून, त्यागातून यश मिळणार याची खात्री आहे. या ऐतिसाहिक भूमीत आपण आलोय. या ठिकाणाहून प्रेरणा घेऊन जनतेची सेवा करुया असेही आवाहन शरद पवार यांनी  केले.

भविष्यातल विजयाचं रणशिंग रायगडावरून फुंकलं जाणार - प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला निवडणूक आयोगाने तुतारी चिन्ह दिल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील यांनी आभार मानले. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आभार मानले पाहिजे, त्यांनी आम्हाला तुतारी हे चिन्ह दिले. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचं रणशिंग आज राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब फुंकणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना आपण मानवंदना दिली, त्यांच्यासमोर नतमस्तक झालो. आज जे चिन्ह आपल्या हातात आहे ते चिन्ह मराठी मुलूखामध्ये सगळ्यात लोकप्रिय चिन्ह होणार आहे, ही काळ्या दगडावरची रेघ आहे.असे जयंत पाटील म्हणाले.

पुढे जयंत पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक लढाईची सुरुवात तुतारी विरोधकांना आव्हान देऊन असायची त्याचबरोबर प्रत्येक विजयाची त्यांच्या विजयी होऊन जावी त्यांचं राजधानीत पुनरागमन व्हायचं त्यावेळी देखील त्यांची तुतारीनेच स्वागत व्हायचं हा सगळ्या महाराष्ट्राचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कर्म धर्म संयोगाने आपण निवडणूक आयोगाला जी चिन्ह दिली ती पहिली तिन्ही चिन्ह निवडणूक आयोगाने काही कारणास्तव नाकारली आणि त्यानंतर आपण सगळ्यांनी पुन्हा विचार करून तुतारी हे चिन्ह एकमतानं निवडणूक आयोगाकडे पाठवले जे निवडणूक आयोगाने त्याला मान्यता दिली याबद्दल आनंद झालेला आहे. याबद्दल सर्व तमाम मराठी मुलूखाला आनंद झाला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या  पासुन परंपरा सांगणारे आमचे तुतारी वाजवणारा पुरुषांत असणारा माणूस हा आज पवार साहेबांचे चिन्ह होणार आहे. या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सगळ्या निवडणुका जाता हे चिन्ह भविष्यकाळात वापरले जाईल असा आम्हाला विश्वास आहे. त्याची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या या चिन्हाच अनावरण आज रायगड किल्ल्यावरून करण्यात येत आहे.असेही जयंत पाटील म्हणाले.


*सेवा सन्मान आणि स्वाभिमान- खासदार सुप्रियाताई सुळे*


सेवा मायबाप जनतेची, सन्मान शेतक-यांचा-महिलांचा-ज्येष्ठ नागरिकांचा आणि स्वाभिमान तुमच्या माझ्या महाराष्ट्राचा असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी किल्ले रायगडावर पक्षाच्या तुतारी चिन्हाच्या अनावर प्रसंगी म्हटले आहे.

 

*तुतारी स्वाभिमानाचं प्रतिक, शिवभक्तांसाठी दुग्ध-शर्करा योग-  खासदार अमोल कोल्हे*


महाराष्ट्राच्या काळजातील तुतारी आता राज्याची स्वाभिमानाची ललकारी होईल. शरद  पवार साहेबांच्या नेतृत्वात प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकारी महाराष्ट्राचा स्वाभिमान कायम बुलंद राहण्यासाठी प्रयत्नशील राहील असे खासदार अमोल कोल्हे  यावेळी म्हणाले.

सेना जेव्हा युद्धाला निघत असते, त्यावेळेस वाजवलं जाणार वाद्य म्हणजे तुतारी आहे, आणि आपण जिंकल्यानंतर युद्धावरून जेव्हा परत येतो तेव्हादेखील तुतारीचं वाजवली जात असते. निवडणुकीच्या युद्धात उतरत असताना  ८४ वर्षाच्या आमच्या योद्धाला तुतारी हातात देऊन शुभ संकेत निवडणूक आयोगाने दिल्याचा विश्वास जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

उल्लेखनीय कामाची प्रशांसा आणि दुसऱ्याच दिवशी हवालदार सापळ्यात ;एवढ्या रुपयाची घेतली लाच... उल्लेखनीय कामाची प्रशांसा आणि दुसऱ्याच दिवशी हवालदार सापळ्यात ;एवढ्या रुपयाची घेतली लाच...
आधुनिक केसरी न्यूज  जळगाव : उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रशस्तिपत्र देत सत्कार झालेला जळगाव जिल्ह्यातील भडगाव पोलीस ठाण्यातील हवालदार ५० हजार...
आज अंगणवाड्या शाळा, महाविद्यालये व खाजगी कोचिंग क्लासेस बंद ; जिल्हाधिका-यांनी निर्गमित केले आदेश
गडचिरोली जिल्ह्यात पुरांचा पाऊस , पुरामुळे तब्बल 50 मार्ग बंद! जीवनाआवश्यक वस्तूचा तुटवडा
मानवतेचा पूजक हरपला : विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते , सरचिटणीस विलास मानेकर
माणुसकीला काळीमा साईनाथ रुग्णालयात आढळले जन्मलेल मृत अर्भक, वाचून थक्क व्हाल
पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस; हवामान खात्याचे नागरिकांना आवाहन...
तत्काळ अजित पवार पुण्याकडे रवाना