धक्कादायक!  पोरांना सिरप देतात तर थांबा! कफ सिरपमध्ये अळ्या आढळल्याने खळबळ....

धक्कादायक!  पोरांना सिरप देतात तर थांबा! कफ सिरपमध्ये अळ्या आढळल्याने खळबळ....

आधुनिक केसरी न्यूज

नंदुरबार:  आपण नेहमीच  लहान मुलांना सर्दी-खोकला झाला की  अनेकवेळा कफ सिरप देत असतो. पण आत हेच कफ सिरप लहान मुलांसाठी घातक ठरताना दिसत आहे. कारण एका रुग्णालयात लहान मुलांना देण्यात येणाऱ्या कफ सिरपमध्ये अळ्या आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील खापर प्राथमिक आरोग्य केंद्रात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आगे. तेथे लहान मुलांना देण्यात आलेल्या कफ सिरपमध्ये चक्क अळ्या आढळल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ६ जानेवारी रोजी रोजी एका बालकाला खापर प्राथमिक आरोग्य केंद्रात खोकल्याचा उपचारासाठी कफ सिरप देण्यात आले होते. मात्र त्यामध्ये अळ्या आढळून आल्यानंतर संबंधितांनी ठाकरे गटाचे आमदार पाडवी यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर त्यांनी खापर प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. तेथे हे औषध लहान मुलांना दिले जात असल्याचं निदर्शनास आल्यावर त्यांनी सरकार आदिवासी बालकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात आरोग्य मंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर आरोग्य उपसंचालक तपासणीसाठी आले  तर आरोग्य प्रशासन बे भरोसे वर सुरू असल्याचा आरोप पाडवी यांनी केला  आहे.

नंदुरबार जिल्हा आदिवासी जिल्हा असल्याने आरोग्याच्या मोठ्या प्रमाणात समस्या उद्भवत असतात, परंतु जिल्हा प्रशासन याकडे सर्रास दुर्लक्ष करताना दिसून येत आहे.सातपुड्याच्या दुर्गम रागांमध्ये मदत संपलेल्या औषधी प्राथमिक केंद्रात सर्रास दिले जात असतात त्यातलाच हा प्रकार एक समोर आला आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात औषध साठा गेला असेल तर तो सिल करण्यात यावा आणीवसंबधित कर्मचारी आणि पुरवठा दारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.  अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. मात्र सरकार किंवा मंत्री या कडून गांभीर्याने लक्ष देत नाही, त्यामुळे आदिवासींच्या जीवाचं काही मोल आहे की नाही, असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. शासनाने या गोष्टीची गंभीर दखल घेतली नाही तर रस्त्यावर उतरण्याच्या इशारा आमदार पाडवी यांनी दिला आहे.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

सिडीसीसी बँकेवर सायबर हल्ला, ३ कोटी ७० लाखांवर मारला डल्ला सिडीसीसी बँकेवर सायबर हल्ला, ३ कोटी ७० लाखांवर मारला डल्ला
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर : दि. 13 रोजी नौकर भरती च्या निमित्ताने गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत असलेल्या चंद्रपूर जिल्हा...
आनंदवन हे ख-या अर्थाने मानवतेचे मंदीर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
माजी मुख्यमंत्रीयांच्या वाढदिवसानिमित्त जनसंपर्क अभियान डॉ.शशिकांत खेडेकर यांचा स्तुत्य उपक्रम 
लोकार्पित झालेली अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचे नवीन दालन ठरेल : आ.किशोर जोरगेवार
केंद्रीय अर्थसंकल्पावर बी.एन.एन. महाविद्यालयात चर्चासत्र संपन्न
चंद्रपूरच्या विधी क्षेत्राने मानले आ.सुधीर मुनगंटीवार यांचे आभार
साईबाबा संस्थानच्या दोन कामगाराचा खुन करणारे दोन आरोपी जेरबंद