मंत्री छगन भुजबळ यांना मराठा आरक्षण विरोध भोवला ; निकटवर्तीय जयदत्त होळकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदांचा राजीनामा

मंत्री छगन भुजबळ यांना मराठा आरक्षण विरोध भोवला ; निकटवर्तीय जयदत्त होळकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदांचा राजीनामा

आधुनिक केसरी न्यूज

किरणकुमार आवारे

निफाड :- मंत्री छगन भुजबळ हे सातत्याने मराठा समाजविरोधात बेताल वक्तव्य करत आहेत. त्यामुळे त्यांच्या मतदार संघात नाराजी निर्माण झाली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच लासलगाव कृ.ऊ.बा. समिती संचालक, लासलगाव ग्रा.पं.सरपंच जयदत्त होळकर यांनी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.
     येवला लासलगाव मतदार संघातील राजकीय वर्तुळात मराठा समाजाचा एकमेव चेहरा म्हणून जयदत्त होळकर यांच्याकडे पहिले जाते. त्यामुळे पंचक्रोशीतून जयदत्त होळकर यांच्या भूमिकेला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शविण्यात येत आहे. यापूर्वी हनुमाननगर ग्रामपंचयतीने भुजबळ यांचा आमदार निधी न घेण्याचा ठराव केला तर ब्राम्हणगाव या गावाने त्यांना किंवा त्यांच्या स्वीय सहाय्यकास गावबंदी करत असल्याच्या पोस्ट सामाजिक माध्यमात व्हायरल झाल्या. आशिया खंडात नंबर एक समजल्या जाणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज मंत्री भुजबळ यांच्या समर्थक पॅनलचा सभापती विराजमान आहे. मात्र याच बाजार समितीतील संचालक राजेंद्र बोरगुडे यांनी होर्डिंग अथवा वर्तमानपत्रातील जाहिरातीत भुजबळ यांच्यासोबत आपला फोटो लावण्यात येऊ नये असे बाजार समितीला पत्र लिहून कळवले आहे. त्यातच भुजबळ यांचे समर्थक व निकटवर्तीय जयदत्त होळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रांतिक सरचिटणीस पदाचा व ४२ गाव अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. जयदत्त होळकर यांचे वडील सीताराम आप्पा होळकर हे भुजबळ यांना येवला मतदार संघात आणनारे पहिल्या फळीतील नेते होते. त्यानंतर जयदत्त होळकर यांनी भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली काम केले. जयदत्त होळकर हे मुंबई बाजार समिती संचालक आहेत. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत ते भुजबळ समर्थक पॅनलमधून निवडून आले आहेत. आज ते येवला लासलगाव मतदार संघातील सर्वात मोठ्या अशा लासलगाव सारख्या गावचे ते सरपंच आहेत. त्यामुळे त्यांचे राजकीय वजनही मोठे आहे. त्यामुळे त्यांची नाराजी भुजबळ यांना नक्कीच परवडणारी नाही.

● मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी
आपण कोणत्याही गोष्टीला सामोरे जाण्यास तयार आहोत. जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण संदर्भात मागण्या अतिशय रास्त आहेत. त्यांना पाठिंबा देतांना त्यांना कोणताही राजकीय हस्तक्षेप नको असल्याने मी मराठा बांधवांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदांचा राजीनामा देत आहे.
जयदत्त होळकर
प्रांतिक सरचिटणीस,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

 


.

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

धक्कादायक अज्ञात व्यक्तीने गोळीबार करत केली युवकाची हत्या धक्कादायक अज्ञात व्यक्तीने गोळीबार करत केली युवकाची हत्या
आधुनिक केसरी न्यूज  राजुरा : दि,२३/७/२०२४ नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील  राजुरा तालुक्यातील पंचायत समिती जवळ असलेल्या बॅक ऑफ...
22 जुलै रोजी शाळा, महाविद्यालये बंद ; जिल्हाधिका-यांनी निर्गमित केले आदेश
लोंबकळलेल्या विजतारांनी घेतला शेतकऱ्याचा जीव.; दोंदवाडे येथील दुर्घटना
जन्मदात्या वडिलांना नराधम मुलाने जिवंत जाळले ;बाळापूर येथील धक्कादायक घटना...
गुरूविना कोण दाखवील वाट..!
सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचा दर
लाचखोर प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकाने स्वीकारली पाच हजाराची लाच...