विश्वचषकादरम्यान पाकिस्तानी स्पोर्ट्स अँकरने अचानक भारत सोडला,  काय आहे कारण ?

 विश्वचषकादरम्यान पाकिस्तानी स्पोर्ट्स अँकरने अचानक भारत सोडला,  काय आहे कारण ?

 आधुनिक केसरी न्यूज

मुंबई : पाकिस्तानची प्रसिद्ध स्पोर्ट्स प्रजेंटर आणि अँकर जैनब अब्बास ही अचानक विश्वचषक सोडून भारतामधून परतली आहे. विश्वचषकासाठी जैनब भारतामध्ये परतली होती. जैनब हिने आतापर्यंत भारताविरोधात अनेकवेळा वादग्रस्त वक्तव्य केलेले आहेत. जैनब हिच्यावर याआधी सायबर क्राईम, भारत आणि हिंदू धर्माबद्दल आक्षेपार्ह भाषेत ट्वीट केल्याचा आरोप होता. तीचे जुने ट्वीट्स सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यामध्ये भारत आणि हिंदू धर्माबद्दल आपत्तीजनक पोस्ट केलेल्या दिसत होत्या. जैनब हिच्याबद्दल बीसीसीआयकडे एका वकीलाने तक्रार केली होती. त्यामुळेच जैनब अब्बास हिला भारत सोडावा लागला. 

पाकिस्तानी न्यूज चॅनल ‘समा टीवी’ ने जैनब अब्बल हिच्याबाबत एक्स खात्यावर पोस्ट केली आहे.  जैनब अब्बास हिने भारत सोडला आहे. सुरक्षेच्या कारणामुळे जैनबला भारत सोडावा लागला. तिच्यावर सायबर क्राईम आणि भारताविरोधीत ट्वीटचा आरोप आहे. 

विनीत जिंदल नावाच्या भारतीय वकिलाने बीसीसीआयकडे जैनबची तक्रार केली होती. विनीत जिंदाल याने ट्वीट करत तक्रारीचे पत्रही पोस्ट केले आहे. विनीत जिंदालचे ट्वीटही सध्या चर्चेचा विषय आहे. विनीत जिंदाल याने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की बीसीसीआय आणि गृह मंत्रालयाला पाठवलेल्या तक्रारीमध्ये जैनाब अब्बास हिला आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये प्रजेंटर म्हणून काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. जैनबने भारत आणि हिंदू धर्माविरुद्ध अपमानास्पद आणि प्रक्षोभक पोस्ट केल्या आहेत. ‘अतिति देवो भव’ हे फक्त आपल्या देशाचा आणि हिंदू धर्माचा आदर करणाऱ्यांसाठी आहे, पण भारतविरोधी स्वागत नाही.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

21ऑगस्टला ‘महा वॉकेथॉन वॉक फॉर वॉटर’ चे आयोजन नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन 21ऑगस्टला ‘महा वॉकेथॉन वॉक फॉर वॉटर’ चे आयोजन नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर, दि. 20 : राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंती निमित्त 21 ऑगस्ट हा दिवस...
विद्यार्थिनीचा पाठलाग करून फोटो व्हायरल करण्याची धमकी; जामोद येथे तरुणाविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा
मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी किशोर सोनवणे यांचे आमरण उपोषण सुरू
धावरी येथे सर्पदंशाने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू 
आरोग्य कर्मचाऱ्यांचे धाडस! सोनी PHC मध्ये अजगराला दिले जीवनदान 
दुर्गामाता मंदिरातील दोन लाख रुपये किमतीच्या चांदीच्या मुकुटाची दिवसाढवळ्या चोरी..!
श्रींच्या स्वागतासाठी भाविकांच्या महासागर..!