।। वाघ : पर्यटकांचे आकर्षण ।।

।। वाघ : पर्यटकांचे आकर्षण ।।

आधुनिक केसरी 

हज्जारो पर्यटक अभयारण्यात भेटी देत असतात. निरनिराळे, प्राणी, पशू, पक्षी ते बघतात. पण त्यांच खास आकर्षण असते ते व्याघ्रदर्शन. दरवर्षी २९ जुलै रोजी जागतिक "व्याघ्रदिन" साजरा केला जातो. २९ जुलै २०१० रोजी रशियातील सेंटपीटर्सबर्गला भरलेल्या व्याघ्र परिषदेत हा दिवस जागतिक व्याघ्रदिन म्हणून घोषित करण्यात आला. विसाव्या शतकाच्या सुरूवातीला जगभरात जवळजवळ एक लाख वाघ होते असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त केला जातो. तर काहींच्या मते ही संख्या चाळीस हजाराचे जवळपास  सांगितली जाते. आता तर ही संख्या चार हजारावर इतकी खाली आली आहे. 

वाघ आणि माणूस यांच्यातला संघर्ष हा काय नवीन नाही. त्यामुळे वनविभागासमोर हा संघर्ष रोखण्यासाठी मोठे आव्हान असते. बऱ्याच वेळा वाघाच्या हल्ल्यात अनेक माणसांचे बळी जातात याला कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात होणारी जंगलतोड  आणि त्यामुळेच त्यांचा अधिवास मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहे वाघाला संचार मार्गासाठी दाट जंगलाची आवश्यकता असते. पर्यायाने त्याचा जंगलाचा अधिवास कमी झाल्याने नकळत तो मानवी वस्तीकडे वळतो. मुद्दाम माणसांवर हल्ला करण्याचा त्याचा हेतू नसतो असे म्हणायला हरकत नाही.

९६/९७ टक्के वाघाची शिकार झाल्याने,नैसर्गिक मृत्यू आल्याने तिन ते चार टक्के म्हणजे ४०००/चे -जवळजवळ वाघ शिल्लक आहेत. या पैकी २२००/२३०० वाघ एकट्या भारतात आहेत. वाघाचे सरासरी आयुष्य साधारणपणे १४ ते १६-१७ वर्षाचेच असते.काही वाघ २०/२२ वर्षी मृत्यू झाल्याची नोंद आहे.  भारतातल्या वाघाची लांबी साधारणपणे साडे आठ ते ११ फूट असल्याचे आणि वजन दिड ते पावणे दोन क्विंटल असल्याचे सांगितले जाते.वाघ ताशी ६५ ते ७० कि.मि.वेगाने पळू शकतो.हत्ती सोडून ईतर प्राण्यांची शिकार तो करतो. भारतात असलेला वाघ हा रा्यल बेंगाल टायगर म्हणून ओळखला जातो. 

आपला देश हा जगातील सर्वाधिक वाघ असलेला देश आहे.आणि म्हणूनच भारतासाठी या दिवसाचे विशेष महत्व आहे. वाघाची संख्या जास्त असल्याने  भारत ही शेवटची आशा आहे असे म्हणतात. भारतात वाघाला वाचवण्या साठी प्रयत्न होत आहेत. कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहे.

देशात ३९ व्याघ्रप्रकल्प आहेत.महाराष्ट्रात नागपूर विभागातील व्याघ्रप्रकल्पात वाघांची संख्या अधिक आहेत,असा पाहणी निष्कर्ष असल्यामुळे, नागपूर ही जागतिक दृष्टीने वाघांची राजधानी संबोधण्यात येते.

चोरट्या शिकारी,आणि नैसर्गिक अधिवास नष्ट होणे,ह्याच कारणांमुळे वाघांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. त्यामुळेच ही वाघाची डरकाळी लुप्त होते की काय ? अशी भिती निर्माण झाली आहे. वाघाच अस्तित्व धोक्यात आल आहे.अन्नासाठी जवळच्या वस्त्यावर वाघ हल्ले करु लागले. अशा परिस्थिती वाघ आणि माणसाचे संबंध बिघडलेचे जाणवते. वाढत्या शहरीकरण आणि व्याघ्र क्षेत्राचा समतोल साधला जाणे साठी नियोजनबद्ध उपाययोजना आणि आवासाची आखणी होणे आवश्यक आहे.नाही तर हा संघर्ष सुरूच रहाणार आहे.परिस्थिती चिघळण्या आधिच शासकीय स्तरावर नैसर्गिक आपत्ती म्हणून दखल घेणे आवश्यक वाटते. स्वयंसेवी संस्था, जनजागृती साठी कार्यक्रम करत असतातच.

वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. जंगलात वाघ असणे म्हणजे संमृध्द जंगलाच प्रतिक आहे.महाराष्ट्रात ही संख्या २०१९ दोनहजार एकोणविस अखेर  ३१२ च्या जवळपास आहे.

व्याघ्रदिन साजरा करत असताना या वाघाचे अस्तित्व कायम रहावे, वाघाची डरकाळी जंगलात ऐकू यावी या साठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे.

केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रलयाचे माहिती नुसार २०१२ ते २०१७ याकाळात ४५ टक्के वाघांचा मृत्यू अनैसर्गिक रित्या झाला.यात शिकार केलेल्या  वाघाची संख्या २२ टक्के होती.

२०१४ च्या गणणे नुसार देशात वाघांची संख्या २२२६ होती. तर जगभरात ३८९० वाघाची संख्या नोंद आहे.२०१८ साली ती.....महाराष्ट्रात ३०३ च्या जवळपास असल्याचे आकडेवारीत दिसते.

महाराष्ट्रातील व्याघ्रप्रकल्प- मेळघाट अमरावती-४२, ताडोबा-अंधारी चंद्रपूर व असंरक्षित क्षेत्र -१०८ , पेंच नागपूर -३२ , संह्याद्री-३, नवेगाव-नागझिरा गोंदिया जिल्हा-७, बोर-वर्धा जिल्हा ४,टिपेश्वर पांढरकवडा अभयारण्य -६, अशी वाघाची संख्या आहे.विदर्भातच ही संख्या जास्त आहे. महाराष्ट्रात ३१२ च्या जवळपास वाघांची नोंद वनविभागा कडे असल्याची माहिती वन मंत्री  यांनी विधानपरिषदेत  दिली होती.  त्यातीत २१२ वाघ असून,१०० बछडे असल्याची माहिती आहे. देशात चौथ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. वाघाची संख्या मागील तुलनेत वाढली आहे. 

वाघाचे मृत्यू चे कारण बघितली तर -शिकारी, विद्युत प्रवाहा धक्का,दोन वाघातला अधिवास संघर्ष यात वाघ मृत्यू पावले आहेत.

२०१६ सालात -१०० वाघांचा मृत्यू झाला.

२०१७ सालात -९८. वाघांचा मृत्यू झाला. तर

२०१८ सालात -१०० -वाघांचा मृत्यू झाला आहे.तसेच गेल्या सात/आठ वर्षात मानव व वन्यप्राणी संघर्षात जवळपास पाचशेचे पेक्षा अधिक बळी गेले आहेेेत. विदर्भात ह्याचा फटका जास्त बसला आहे.वाघाची संख्या वाढत असलीतरी अशा  कारणांमुळे  वाघ-आणी माणसातला संघर्ष वाढला आहे...तरीही वाघानं शिवाय जंगल नाही.

असा हा जंगलाचा राजा, जंगलाचा श्वास आहे, ज्याला बघण्यासाठी लाखो पर्यटक, आभयारण्याला भेटी देत असतात. कुठल्याही अभयारण्यात पर्यटक भेट देतात तेव्हा वाघाच दर्शन व्हाव ही अपेक्षा ठेऊन असतात.अनेक जंगली प्राणी दिसतात.पण वाघ दिसत नाही तो पर्यंत त्याची ट्रिप-पर्यटन पूर्ण होत नाही. त्याच कारणांमुळे पर्यटक आपला मुक्काम वाढवतात. गेल्या काही वर्षाची आकडेवारी बघितली तर, वाघ संपण्याची भिती निर्माण झाली आहे. कारण वाघ संपला, नाहीसा झाला तर त्याची निर्मिती मानवाचे हाती नाही.

दरवर्षी जागतिक व्याघ्र दिनानिमित्त हेच आवाहन केले जाते. आपण एक दिवसा पुरता तो दिवस साजरा करतो,मग त्याचा विसर पडतो. वाघ ही जंगल संपत्ती आहे.तिची जपणूक व्हायला हवी.अनेक देशांची आर्थिक घडी ह्या वन-जंगल संपत्ती वर बसली आहे.तेव्हा वाघानं सह ह्या वन संपत्तीचे रक्षण होणे,करणे हे आपल सगळ्यांच कर्तव्य आहे.वाघानं शिवाय जंगलाची पूर्णता नाही. वाघाची संख्या महाराष्ट्रात झपाट्याने वाढत आहे आज जवळपास साडेतीनशे पेक्षा वाघ महाराष्ट्रात आहे आणि त्यातील सुमारे 200 पेक्षा अधिक वाघ हे चंद्रपूर जिल्ह्यासह ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आहे. २९ जुलै रोजी जागतिक व्याघ्रदिन साजरा करण्याचा उद्देश हाच कि वाघांच्या नैसर्गिक अधिवासांचे संवर्धन करुन जनजागृती करणे. जेणेकरून वाघ आणि माणूस यांच्यातील संघर्ष वाढणार नाही. त्यामुळेच वाघांचे जंगलातले अस्तित्व टिकून राहणार आहे आणि जंगलात वाघाची डरकाळी सतत ऐकू येणार आहे.

dilip

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

भीम जयंती मिरवणुकीत वाहन घुसल्याने एकाचा मृत्यू.एक जखमी भोकर येथील घटणा भीम जयंती मिरवणुकीत वाहन घुसल्याने एकाचा मृत्यू.एक जखमी भोकर येथील घटणा
आधुनिक केसरी न्यूज  भोकर :  रविवारी ( ता.२६) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली होती.रात्री ९...
​गोंदियात उपवर्गीकरणा विरोधात भीमगर्जना, बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करण्या
तिहेरी खुन प्रकरणातील मुख्य सुत्रधार साई गँगचा सुत्रधार, साई उर्फ साईलाला गहेरवार व  नितेश इंगळे यास वाराणसीत अटक 
Breking News : भ्रष्टाचारी चार आयएएस अधिकाऱ्यांचे प्रकरण उघड करणार : नाना पटोले 
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राजमाता राणी हिराई सोहळ्याला गालबोट लावले ; आदिवासी समाजाच्या वतीने तीव्र निषेध
हडसणी फाट्यावर भीषण अपघात, भरधाव कारने दोन दुचाकींना उडवले ४ जण ठार : एकाची प्रकृती चिंताजनक
महिला आरक्षणावर खुल्या चर्चेस काँग्रेस तयार; मुख्यमंत्र्यांनी सांगावे कधी व कुठे चर्चा करायची? मोदींनाही चर्चेला बोलवा: खा. प्रणिती शिंदे