लाल बावटा शेतमजूर युनियनचे कलेक्टर कार्यालयावर धरणे आंदोलन

लाल बावटा शेतमजूर युनियनचे कलेक्टर कार्यालयावर धरणे आंदोलन

भुमीहीनांना जमीन, मजूरांना किमान वेतन,पूरेशे राशन, वृध्दापकाळात पेन्शन, मुलांना मोफत शिक्षण आदी मागण्यांकडे वेधले लक्ष.

आधुनिक केसरी न्युज 

औरंगाबाद: महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनच्या औरंगाबाद जिल्हा शाखेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी १० ते ४ पर्यंत धरणे आंदोलन झाले. भुमीहीनांना जमीन, मजूरांना किमान वेतन, पूरेशे राशन, वृध्दापकाळात पेन्शन, मुलांना मोफत शिक्षण, निराधारांना नियमित अनुदान आदी मागण्यांकडे आजच्या आंदोलनाद्वारे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

 

तुर्काबाद खराडी,कदीम टाकळी,  वावना,निधोना,वाहेगाव,वडोद बाजार,वाळूज,आंबेलोहळ,आळंद,शेरुडी,पाडळी,सिल्लोड आदी गंगापूर, फुलंब्री,सिल्लोड, औरंगाबाद तालुक्यातील सुमारे २५ गावातील भूमीहीन,गायरानधारक,बेघर,रोहयो मजूर यात सहभागी झाले होते.अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री.गव्हाणे यांना लाल बावटा शेतमजूर युनियनचे २० जणांचे शिष्टमंडळ भेटले व विविध मागण्यांचे निवेदन सादर करून चर्चा केली.

आजच्या आंदोलनाचे नेतृत्व लालबावटा शेतमजूर युनियनचे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष कॉ.प्रा.राम बाहेती, जिल्हा सचिव तथा राज्य सहसचिव कॉ.गणेश कसबे, कॉ.शेख नूर,कॉ.गयाबाई सोनवणे,कॉ.मोबीन बेग, कॉ.विठ्ठल त्रिभुवन,कॉ.हरिभाऊ हाटकर, कॉ.इंदुमती केवट, कॉ.बशीर खान आदींनी केले. शेतमजूर पंचायतचे साथी सुभाष लोमटे,लाल निशाण पक्षाचे कॉ.भीमराव बनसोड, भाकपचे जिल्हा सचिव कॉ.अशफाक सलामी, हॉकर्स, कंत्राटी कामगार व रिक्षा युनियनचे नेते कॉ.अभय टाकसाळ,आॅल इंडिया यूथ फेडरेशनचे विकास गायकवाड आदींनी यावेळी शुभेच्छा दिल्या. 

 त्र्यंबक चौथमल,बबन बोराडे, कैलास थोरात,शाबेरा फैय्याज, रामनाथ काळे, अशोक बत्तीशे,शोभाबाई आव्हाड,नंदु तोडकर, धोंडीराम खोतकर, परमेश्वर बत्तीशे,चंद्रभान काळे, अशोक बत्तीशे,संजय वाघ, भगवान वाघ,कॉ.सलीम,रुखमण बाई श्रिखंडे,कानबाई जाधव, शशिकला तिकटे आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह सुमारे ७० -७५ जण आजच्या धरणे आंदोलनात उपस्थित होते. येत्या १३ जून रोजी मुंबई येथे मंत्रालयात लाल बावटा शेतमजूर युनियनचे २५ जणांचे शिष्टमंडळ संबंधित मंत्र्यांना भेटून खालील मागण्या संदर्भात चर्चा करणार आहे.तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनी २६ जून रोजी बीड येथे राज्यव्यापी गावरान व वनजमीन हक्क परिषदही लाल बावटा शेतमजूर युनियनच्या वतीने होणार आहे.आज जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात खालील मागण्यांचा समावेश आहे.

*मागण्या*

(१) गायरान जमीन धारकांच्या नावे जमीनीचे पट्टे करण्यात यावेत.(२) अतिक्रमणे नियमित करण्यासाठी शासनाने पूर्वी ठरवलेली १४ एप्रिल १९९० ही तारीख दुरूस्त करून आजपर्यंतची सर्व अतिक्रमणे नियमित करावीत(३) सरकारी ,गायरान जमीनीवरील अतिक्रमित धारकांची अतिक्रमणे कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजनेअंतर्गत नियमित करावीत(४) रोजगार हमी मजूरांना ६००/- रूपये किमान वेतन देण्यात यावे.(५) केरळ ,तामिळ नाडू राज्यांप्रमाणे शेतमजूरांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे.(६) शेतमजूरांसाठीचा केंद्रीय कायदा केंद्र सरकारने करावा.(७) श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे थकीत अनुदान अदा करावे.दरमहा ५ तारखेच्या आत अनुदान देण्यात यावे व दरमहा किमान २००० अर्थसहाय्य देण्यात यावे.(८) गरजू निराधारांना दाखल्याची अट रद्द करावी.लाभार्थ्यांची वयोमर्यादा ६० वर्षे करण्यात यावी.(७) गरजू बेघरांच्या घरकुलांची सर्व प्रकरणे मंजूर करावी.(८) घरकुलासाठी ५ लाख रूपयांचे अनुदान देण्यात यावे.(९) पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बंद करण्यात आलेले पोर्टल त्वरित सुरू करावे.(१०) शेतमजूर व ग्रामीण कष्टकऱ्यांना दरमहा किमान २०००/- रूपये पेन्शन देण्यात यावे.(११) शेतमजूर, ग्रामीण कष्टकऱ्यांच्या मुलांना मोफत व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात यावे. (१२) मध्यान्ह भोजन योजनेवरील खर्चात कपात करू नये व याचे अनुदान वाढवण्यात यावे (१३) प्राथमिक आरोग्य केंद्रे व उप केंद्रात सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा व सुविधा उपलब्ध कराव्यात.(१४) सार्वजनिक वितरण व्यवस्था मजबूत करावी.(१५) विकास कामासाठी अतिक्रमितधारकांच्या घेतलेल्या जमीनीचा योग्य मोबदला देण्यात यावा.(१६) सिंचन‌ विहिरीच्या कुशल व अकुशल कामाचा मोबदला त्वरित देण्यात यावा.महुमणी रोपवाटिकेच्या कामाचा थकीत मोबदला त्वरित द्यावा.(१७) कष्टकरी,दलित, गरीब मंडप व्यावसायिक, बॅंड वाजवणारे इ. कष्टकऱ्यांचे सर्व कर्ज माफ करण्यात यावे.(१८) जिल्ह्यातील रोजगार हमीच्या कामाचे थकीत वेतन त्वरित अदा करावे.(१९) मनरेगाचे अनुदान वाढवण्यात यावे.(२०) सतत वाढत जाणाऱ्या महागाईस आळा घाला.शेतमजूर,रोहयो मजूर व ग्रामीण कष्टकऱ्यांचे जगणे सुसह्य करा.

बैठकीच्या प्रारंभी शेतमजूर युनियनचे दिवंगत नेते कॉ.मनोहर टाकसाळ व किसान सभेचे दिवंगत नेते कॉ.नामदेव गावडे यांना श्रध्दांजली ‌वाहण्यात आली.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

शिकारच्या शोधात वाघाचा विहीरीत पडून मृत्यू शिकारच्या शोधात वाघाचा विहीरीत पडून मृत्यू
आधुनिक केसरी न्यूज  गोंदिया : शिकार व पाण्याच्या शोधात शेतशिवारात आलेल्या ४ ते ५ वर्षीय वाघाचा शेतातील कठडे नसलेल्या विहीरीत...
गुरुनिष्ठेचं सर्जनशील दर्शन घडवणारा ग्रंथ : प्रा. डॉ. कैलास अंभुरे
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता
मंठा पोलिसांची गावठी हातभट्टीवर मोठी कारवाई : ८० हजारांचा मुद्देमाल जप्त, हजारो लिटर हातभट्टी दारू नष्ट
सप्तसुरांवर अधिराज्य गाजवणाऱ्या आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद : विजय वडेट्टीवार 
चतुरस्त्र सूर हरपला; आ.सुधीर मुनगंटीवार यांची आशाताई भोसले यांच्या निधनाबद्दल हृदयस्पर्शी शोकसंवेदना
संगीताच्या इतिहासातील सुवर्ण अध्याय संपला : आ. किशोर जोरगेवार