बारा किलोमीटर च्या रस्त्यावर बारा हजार खड्डे..!

बारा किलोमीटर च्या रस्त्यावर बारा हजार खड्डे..! मंत्री महोदय ग्रामीण भागातील रस्त्यावर लक्ष द्या 

बारा किलोमीटर च्या रस्त्यावर बारा हजार खड्डे..!

कन्नड-चिखलठान रस्त्यावर मरणयातना; रस्ता रोको, आंदोलन करून ही परिस्थिति "जैसे थी वैसी है"

 

आधुनिक केसरी न्यूज

सय्यद आरेफ़

 कन्नड तालुक्यात महामार्गाचे काम जलद गतिने करून रस्ते चका-चक करण्यात आले, तसेच मोठ्या प्रमाणात बाय-पास हाइवे चे काम आता आंतिम टप्यात राहिल्याचे दिसत आहे, ज्या प्रमाणे महामार्गाचे काम शुरू त्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात टोल नाके सुद्धा बनविन्यात आले आहे,आणि तिथुन सक्तीने टोल वसूली सुरु असल्याने माहिती समोर आली आहे, एकी कड़े शासन न होणारे काम तड़का फडकी ने करीत आहे, ते पन कोटया वधिचे काम, मात्र ग्रामीण भागाला जोडणाऱ्या रस्त्यालाच का घर-घर लागली आहे? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे, कन्नड-चिखलठाण रसत्याची अत्यंत चाळनी झाली असून येणाऱ्या जाणाऱ्याना तारेवर्ची करसत करावी लागत आहे, कन्नड चिखलठाण या रस्त्याची पूर्णपणे वाट लागली आहे जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे वाहने कृती होत असून वाहन धारकांना पाठ मनक्याच्या आजारा समोर जावे लागत आहे या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागात जाणीवपूर्वक वृक्ष दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे चिखलठाण ते कन्नड या रस्त्याची दुरवस्था मुळे पंचक्रोशीतील गावांचा विकास खुंटला असल्याची स्थिती सत्य समोर येत आहे संबंधित विभागाचे अधिकारी ठेकेदारांच्या मनमानीमुळे ग्रामस्थांना मरण यातना भोगायला लागत आहे रस्त्याच्या खड्ड्यांमुळे चिखलठाण,भोकनगांव, दाभाडी बहीरगाव, कुंजखेड़ा, हिवरखेडा ठाकुरवाडी नींडोंगरी,वडाळी घूसरतांडा, तिसगाव ,या गावातील नागरिकांना अत्यंत अडचणीचा सामना करावा लागत आहे संतप्त नागरिकांनी चार वेळा नाक्यावर रास्ता रोको केला तरीदेखील प्रशासन याची काहीच दखल घेतलेली नाही वेळेपुरते आंदोलकांना दिलासा देऊन देऊन वेळ काढला जात आहे, मात्र या रस्त्याचा प्रश्‍न कोणी सोडायला तयार नाही,

 कन्नड तालुक्यातील चिखलठाण या रस्त्याला तब्बल दहा वर्षे झाले आहे ,त्याच्यामध्ये ज्या वेळेस मोर्चे आंदोलन केले जाते.त्याच वेळी संबंधित विभाग ,थातुरमातुर डागडुजी करून वेळ काढून घेतात, मात्र या रस्त्याचे डांबरीकरण व रुंदीकरण करून समस्या मिटवयाला कोन्ही तयार नाही, उदासीन लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे, या सर्व प्रकारातील रस्त्याची तुलना करता गुणवत्तेच्या संदर्भात या रस्त्याचा स्पर्धा करू शकेल असा एकही रस्ता तालुक्यात अजिबात दिसणार नाही, हे ही नेमकी कोणाची अपयश? येथे कार्यरत असलेले विविध प्रशासकीय अधिकारी येथील लोकप्रतिनिधींना जुमानत नाही का? येथील रस्ते अधिकार्‍यांच्या भ्रष्टाचाराचे कुरने बनले आहे, भूतकाळात हे वारंवार सिद्ध झाले आहे रस्ते बांधकामाचे निकषांचे पालन केले जात नाही, याकडे कोणाचे लक्ष नाही बहुतांशी रस्त्याची बाजू पट्टी नाही, साइड पंखे वेवस्थित भरले नही ज्या ठिकाणी नवीन काम केले आहे तिथे रस्ता फुटायला सुरवात झाली आहे. वारंवार मागणी करून ही रसत्याचे काम मार्गी लागत नसल्याने सम्बंधित विभागा बद्दल नागरिक रोष ची भावना व्यक्त करीत आहे,

 

*लोकप्रतिनिधि निवडणुका पुरते येता आणी मोठे आश्वासन देऊन गायब होता...*

चिकलठान परिसरातील लोकांना कन्नड तालुका हा एक महत्त्वाचा भाग मानला जातो, कारण तिथं तहसील कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, पोलीस स्टेशन, बँका, तसेच मुलांचे शाळेचे शिक्षण, उच्चशिक्षण, यासाठी ग्रामीण लोकांना कन्नड जावेच लागते. मात्र दररोज येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था पाहिल्याने दररोज येणारे जाणारे प्रवासांचे काय हाल होत असेल? हे आम्हालाच माहित असा प्रश्‍न ग्रामीण उपस्थित करत आहे, कन्नड तालुक्यातील कन्नड तालुक्यात शहरा सोबत प्रत्येक ठिकाणी मोठमोठे महामार्ग निघालेल्या आहे, मात्र ग्रामीण रस्त्याकडे कोणीच लक्ष द्यायला तयार, चिखलठान गावाची लोकसंख्या मोठी असल्याने इथे सर्वच प्रकाराचे नेते मंडळी, लोकप्रतिनिधि येतात सभा घेतात मोठ मोठाले आश्वास देऊन गायब होतात, या रसत्या बाबत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या कड़े रसत्या बाबत निवेदन देऊन कैफियत मांडली होति, मागील काहि वर्षा पासून रसत्याची दयानीय दुरवस्था झाली असून याकडे कोंन्हीच लक्ष द्याला तयार नसल्यामुळे नागरिक संबंधित विभागाच्या विरोधात रोष व्यक्त करत आहे,

 

*प्रतिक्रिया*

तालुक्यातिल चिखलठान हा गाव उद्योग धंदया सोबत आधुनिक शेती करून प्रगतिशील शेतकरीचे प्रमाण अधिकच आहे, येथे दूधाचा व्यवसाय प्रगतिपथावर सुरु आहे,तसेच या ठिकाणी शेतकरयांचे माल घेण्याची दूर दुरुन व्यापारी वर्ग येतात, मात्र मागील काहि वर्षा पासून कन्नड चिखलठान रसत्याची व्यवस्था अधिक बिकट होत चाल्ल्याने रसत्या अभावी व्यापारी वर्ग येणे टालू राहिले, अनेकांना या रसत्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे, सम्बंधित विभागाने आमचा धिर चा फायदा उचलु नये व तातडीने या रसत्याचे काम सुरु करावे

- युवराज चव्हाण माजी सरपंच चिखलठाण

 

रसत्यानमुळे अनेकांना मंनक्याचे,कम्बरेचे,पोटाचे आजार जडले आहे,या रसत्याचा सर्वात जास्त त्रास वयोवृद्ध लोकांना होतो, कन्नड जाण्याची रसत्याची अवस्था बघून इच्छाच होत नाही,परिसरात मोठे दवाखाने नसल्याने गरोदर मातेचि तर जास्तच होल होत आहे, अनेकांनी तर खराब रसत्या मुळे कन्नड येथील दवाखान्यात नेत असतांना रसत्याटच दम सोडले आहे, रसत्या अभावी नागरिकांना नाहक त्रासाचा सामना करावा लागत लवकरात लवकर या रसत्याचे काम सुरु करावे नस्ता उपोषण करण्यात येईल,

-शिवप्रभु ज्ञाने, सामाजिक कार्यकर्ते चिखलठाण

कन्नड तालुक्यातील चिखलठान परिसरात रसत्याची अशी दयानीय व्यवस्था झाली आहे एखादा तरी पाऊस पडली की रसत्याला तलावाचे स्वरूप येता,यावरून कळते की रसत्याची व्यवस्था कशी असेल..

 

छाया : सय्यद आरेफ़

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

शिकारच्या शोधात वाघाचा विहीरीत पडून मृत्यू शिकारच्या शोधात वाघाचा विहीरीत पडून मृत्यू
आधुनिक केसरी न्यूज  गोंदिया : शिकार व पाण्याच्या शोधात शेतशिवारात आलेल्या ४ ते ५ वर्षीय वाघाचा शेतातील कठडे नसलेल्या विहीरीत...
गुरुनिष्ठेचं सर्जनशील दर्शन घडवणारा ग्रंथ : प्रा. डॉ. कैलास अंभुरे
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता
मंठा पोलिसांची गावठी हातभट्टीवर मोठी कारवाई : ८० हजारांचा मुद्देमाल जप्त, हजारो लिटर हातभट्टी दारू नष्ट
सप्तसुरांवर अधिराज्य गाजवणाऱ्या आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद : विजय वडेट्टीवार 
चतुरस्त्र सूर हरपला; आ.सुधीर मुनगंटीवार यांची आशाताई भोसले यांच्या निधनाबद्दल हृदयस्पर्शी शोकसंवेदना
संगीताच्या इतिहासातील सुवर्ण अध्याय संपला : आ. किशोर जोरगेवार