आधुनिक केसरी स्पेशल: जगातील पहिली महिला सर्पमित्र ‘वनिता बोराडे’

आधुनिक केसरी स्पेशल: जगातील पहिली महिला सर्पमित्र ‘वनिता बोराडे’

राष्ट्रपतींच्या हस्ते ‘नारी-शक्ती’पुरस्कार प्रदान ! वन्यजीव संवर्धन चळवळ उभारली !तीस वर्षांत ५१ हजार सापांना जीवनदान! प्रा.बाळासाहेब बोराडे ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे’या उक्तीप्रमाणे महिला सर्पमित्र वनिता बोराडे यांनी वन्यजीव संवर्धन मोहीम हाती घेतली.वयाच्या दहाव्या वर्षांपासून सापांशी मैत्री केली.मागील तीस वर्षांत एक्कावन्न हजार सापांना जीवनदान दिले.पर्यावरण हेच प्राणसंजीवनआहे. मानवजातीचे हित त्यात सामावले आहे.वनिता बोराडे म्हणतात, वन्यजीव, नैसर्गिक… Continue reading आधुनिक केसरी स्पेशल: जगातील पहिली महिला सर्पमित्र ‘वनिता बोराडे’

राष्ट्रपतींच्या हस्ते ‘नारी-शक्ती’पुरस्कार प्रदान !

वन्यजीव संवर्धन चळवळ उभारली !तीस वर्षांत ५१ हजार सापांना जीवनदान!

प्रा.बाळासाहेब बोराडे

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे’या उक्तीप्रमाणे महिला सर्पमित्र वनिता बोराडे यांनी वन्यजीव संवर्धन मोहीम हाती घेतली.वयाच्या दहाव्या वर्षांपासून सापांशी मैत्री केली.मागील तीस वर्षांत एक्कावन्न हजार सापांना जीवनदान दिले.पर्यावरण हेच प्राणसंजीवनआहे. मानवजातीचे हित त्यात सामावले आहे.वनिता बोराडे म्हणतात, वन्यजीव, नैसर्गिक संपदा ही आपली राष्ट्रीय संपत्ती.तिचे रक्षण करणे हे आपले आद्य कर्तव्य. सर्पमित्र वनिता बोराडे यांनी वन्यजीवांचे संगोपन,संवर्धन, संरक्षण आणि प्रबोधन या चतु:सूत्रीचा वापर केला. शाळा, महाविद्यालय,सामाजिक संस्था, शासन या माध्यमातून जनजागृती केली.त्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत.महाराष्ट्र शासनाने ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री’पुरस्कार, राष्ट्रीय सेवा सन्मान, गिनीज बुक,एशिया बुक,लिम्का बुक,इंडिया बुक,महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् यासारख्या संस्थांनी त्यांच्या कार्याची नोंद घेतली.नोबेल शांतता पुरस्कारासाठी तीन वेळा नामांकन.आंतरराष्ट्रीय पर्यावरणवादी संघटनांनी जगातील पहिली सर्पमित्र महिला म्हणून घोषणा केली. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून आठ मार्च २०२२रोजी जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रपती भवन नवी दिल्ली येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते’नारी-शक्ती’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांचा हा सन्मान सकल नारी जातीचा सन्मान आहे.


आपण नुसते सापाचे नाव ऐकले तरी आपल्या अंगावर काटा येतो.रस्त्यावरून जातांना अचानक भला मोठा साप दिसला की भंबेरी उडते.भल्या भल्याना घाम फूटतो. कधीकधी तर काडी किंवा दोरीलाही साप समजून घाबरतो. रात्री स्वप्नात साप आला की दचकून खडबडून जागे होतो. आपण नेहमीच सापांच्या दहशदीखाली वावरत असतो. सापाबद्दलचे अज्ञान,अंधश्रद्धा आणि गैरसमज हे त्यांचे महत्वाचे कारण.भीतीपोटी लोक घाबरून स्वतः मरतात आणि सापालाही मारतात.परंतु या बाबतीत महाराष्ट्रातील कर्तबगार व साहसी कृषिकन्या,महिला सर्पमित्र वनिता बोराडे यांनी मानवी जीवनातील पर्यावरणाचे महत्व जाणून वन्यजीवांचे संरक्षण, संगोपन,संवर्धन व प्रबोधन या चतुःसूत्रीच्या माध्यमातून साप वाचवण्याचा निर्धार केला. सामाजिक संस्था,शासकीय कार्यालये,शाळा, महाविद्यालयातुन जनजागृती केली.तीस वर्षात एक्कावन्न हजार सापांना जीवनदान दिले.जल,जन,जंगल,जमीन, आणि जनावर यांना वाचवण्याची मनाशी खूणगाठ बांधली.जगातील पहिली सर्पमित्र महिला होण्याचा मान त्यांना मिळवला.आठ मार्च रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते जागतिक महिला दिनानिमित्त ‘नारी शक्ती’पुरस्कार प्रदान करण्यात आला.

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर ही सर्पमित्र वनिता बोराडे यांची कर्मभूमी.सामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म. बालपण ग्रामीण भागात गेले.’कृषिकन्या’असल्याकारणाने शेतीशी जवळून संबंध आला.बालपणी निसर्गातील दुर्गम भागात भ्रमंती. आदिवासी बालमित्रांकडून पशु-पक्षी, सरपटणाऱ्या प्राण्यांविषयी जाणून घेतले. झाडावर चढणे,डोंगररांगा सर करणे,विहिरी, नदी-नाले, डोहात पोहणे,झाडांचा डिंक,मधाचे पोगिळंकृत गोळा करणे हे त्यांचेआवडीचे खेळ.त्यामुळे बालवयातच पर्यावरणाचे बाळकडू मिळत गेले.त्यातूनच वन्यजीव व साप या विषयी अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली. मधमाशा,पशु-पक्षी, जनावरे, सरपटणारे प्राणी यांना जीवनदान दिल्याचा आनंद गगनात मावेनासा होई.आंतरातम्याला समाधान मिळत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.परिसरात गोंड,आदिवासी,भिल्ल,बंजारा समाजांची लोकवस्ती असायची.ही सर्व मंडळी शेतात काम करण्यासाठी यायची.बालसवंगड्या बरोबर रममाण होऊन त्यांच्या सहवासातून आदिवासी कला,जीवन पध्दती, चालीरीती,रूढी परंपरा,कलामहोत्सव,निसर्ग सौंदर्य यांचा त्यांना जवळून परिचय झाला.प्राणिमात्रांवर जीव जडत गेला.निसर्ग सानिध्यातुन वन्यजीव व सापाविषयी काम करण्याची प्रेरणा मिळत गेली.

सर्पमित्र वनिता बोराडे यांना वयाच्या दहाव्या वर्षांपासून साप पकडण्याचा छंद लागला.सुट्टीच्या दिवसात शेतात सफर असायची.मच्छिमार मासे पकडण्यासाठी नदीत जाळे टाकायचे.माशाबरोबर सापही जाळ्यात अडकायचे. मच्छिमार मासे बाजूला काढून साप परत पाण्यात सोडून द्यायचे.त्यावेळी त्यांच्या बालमनात अनेक प्रश्न निर्माण होत असत. या लोकांना साप कसे चावत नाहीत,त्यांना भीती वाटत नसेल का,ते सापाला कसे हाताळतात यासारखे प्रश्न मनात रेंगाळत.नंतर त्यांनी प्रत्यक्ष सापांना हाताळे.त्यातून त्यांना सापाबद्दलचे स्पर्शज्ञान होत गेले.हळूहळू सापाबद्दलची भीती आणि गैरसमज मनातुन कायमचे निघून गेले.पर्यावरण हे प्राण संजीवन या ब्रीदवाक्या प्रमाणे स्वतःचा जीव धोक्यात घालून निस्वार्थी भावनेतून वन्यजीव व सापांची सेवा केली. सापाविषयीचे गैरसमज दूर करून समाजात प्रबोधन घडवून आणले.मागील तीस वर्षांपासून खेडोपाडी, रानोरानी, डोंगरदऱ्या, नदी-नाले,विहिरी, तलाव,छतावर कितीतर अवघड ठिकाणी बिळात लपून बसलेले साप पकडून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी व नोंदणी करून पकडलेल्या सापांना वनविभागातील पोलिसांच्या उपस्थित जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडले जाते.यामुळे साप आणि लोकांचे जीवन वाचण्यास मदत होते.मधमाशा,पशुपक्षी, सरपटणारे प्राणी यांना जीवनदान मिळाल्याचा आनंद होतो.मनाला समाधान मिळते.वनिताताई सांगतात माझ्या कुटुंबातील सदस्य आई-बाबा भाऊ यांनी कधीही कोणत्याच प्रकारचा सापाला स्पर्श केला नाही.पकडणे तर दूरच. घरात अध्यात्मिक वातावरण असल्या कारणाने मांसाहार वर्ज्य असे.लग्नानंतर सासरीही असेच भेटले त्यामुळे मांसाहार करण्याचा विशेष उरला नाही.साप,शेती, शेतकरी आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी मी गेल्या तीस वर्षापासून वन्यजीव संरक्षण संवर्धन करण्यासाठी चळवळ सुरू केली आहे.त्याचे फलित म्हणजे आजपर्यंत हजारो साप आणि लोकांचे प्राण वाचवले. सापाविषयी चे गैरसमज दूर करून शास्त्रीय दृष्टिकोनातून प्रबोधन केले.यातूनच समाजामध्ये पर्यावरणा बद्दलची सद्भावना वाढीस लागल्याचे म्हटले आहे.

भारतामध्ये अज्ञान अंधश्रद्धामुळे लोकं सापांची हत्या करतात.आपली संस्कृती मात्र भूतदयेला महत्त्व देते. पशु, पक्षी,प्राणी यांना संरक्षण देऊन प्राणीमात्रांविषयी सदभावना निर्माण करण्याची शिकवण संस्कृती देते.मी या चळवळीतून वन्य जीवनाचे रक्षण करून पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावण्याचा प्रयत्न केला.पर्यावरण प्राण संजीवनीआहे.वन्यजीव,साप ही आपली राष्ट्रीय संपत्ती.त्यांचे संगोपन,संरक्षण आणि संवर्धन करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून गेल्या तीस वर्षापासून मी काम करत आहे या कार्याला समाजानेही भरभरून प्रतिसाद मिळाला.मागील तीस
वर्षात एक्कावन्न हजारापेक्षा जास्त सापांना जीवनदान दिले. याकामी पती डी. भास्कर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.सामाजिक कार्यास प्रोत्साहन दिले.रात्री-अपरात्री शेतकऱ्यांचे फोन आले की लोकांच्या मदतीला धावून जावे लागते.बोराडे परिवाराने साप तसेच इतर वन्यजीव वाचवण्याचा मोहीम हाती घेतली आहे सुरवातीच्या काळात लोकांना त्यांच्या सामाजिक कार्यावर विश्वास बसत नव्हता.अज्ञान,अंधश्रद्धेपोटी लोकं त्यांना जडीबुटीवाली,जादुटोनावाली म्हणायचे.चुकीच्या अफवा पसरावयाचे सापांच्या बदल्यात या बाईला काही आर्थिक लाभ मिळत असेल असा गैरअर्थ लावत असत. त्यांनी लोकांच्या टीकेला गांभीर्याने घेतले नाही.कुठलाही वाद न घालता कामावर पूर्ण निष्ठेने लक्ष केंद्रित केले.आज तीच माणसं या कार्याकडे आदराने पाहत आहे. समाजाने त्यांचे सेवाकार्य समजून घेतले व सहकार्यही केले.

वनिता बोराडे यांच्या सामाजिक कार्याची दखल राज्य,राष्ट्र, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यातआली.त्यांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले.नोबेल शांतता पुरस्कारासाठी तीन वेळा नामांकन, मिशन इंटरनॅशनल जागतिक शांतता परिषदेच्या त्या सदस्य आहेत. आंतरराष्ट्रीय मल्टी टॅलेंट पुल मिशनचे सदस्य, इंटरनॅशनल स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मंगळअभियानांतर्गत प्रक्षेपित केलेल्या उपग्रहावर पर्यावरणीय वन्यजीव सामाजिक कार्यकर्ता म्हणून सन्मान करण्यात आला.भारतीय डाक पोस्टल सेवेद्वारे त्यांच्या कार्याच्या सन्मानार्थ टपाल तिकीट जारी केले. महाराष्ट्र शासनाकडून छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार, जागतिक राज्यघटना आणि संसदीय संघाकडून आजिवन सदस्यत्व,गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस्,, लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्,इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्, यासारख्या जागतिक संस्थांनी वनिता बोराडे यांना सर्परक्षक,सर्पतज्ञ आणि सर्पमित्र म्हणून घोषित केले. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘राष्ट्रीय सेवा सन्मान-२०२१’या पुरस्काराने सन्मानित.भारत सरकारच्या२०२१च्या पद्मश्री पुरस्कारासाठी नामांकन.८ मार्च २०२२ रोजी राष्ट्रपती भवन नवी दिल्ली येथे भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘नारीशक्ती’या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

वन्यजीव,साप शेतकऱ्यांचे मित्र;समाजाने त्यांचे रक्षण करावे.

भारतामध्ये सापांच्या बावन्न जाती असून त्यापैकी फक्त बारा जाती विषारी तर चाळीस बिनविषारी आहेत.म्हणजे भारतातील नव्वद टक्के साप बिनविषारी आहेत.स्वतः हुन कोणता साप हल्ला करत नाही.साप डख धरतोअसे म्हणणे चुकीचे,निराधार आहे.सापं अंधार,गारवा, बीळ आशा सुरक्षित ठिकाणी लपून बसतात. भारतात शासकीय रुग्णालयात सर्पदंश प्रति-विष लस मोफत उपलब्ध आहे.त्यामुळे बाधित रुग्णांचे प्राण वाचवण्यास मदत होते.भितीचे काहीच कारण नाही.अंधश्रद्धा,गैरसमज दूर होऊन सापाचे संवर्धन,संरक्षण आणि प्रबोधन होणे गरजेचे आहे.साप घुशी,उंदरांचा नाश करतो.पीकांचे संरक्षण करतो.त्यामुळे साप शेतकऱ्यांचा शत्रू नसून मित्र आहे. पर्यावरण हे प्राण संजीवी आहे.म्हणून युवकांनी वन्यजीव, पर्यावरण संवर्धनास हातभार लावला पाहिजे.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

भीम जयंती मिरवणुकीत वाहन घुसल्याने एकाचा मृत्यू.एक जखमी भोकर येथील घटणा भीम जयंती मिरवणुकीत वाहन घुसल्याने एकाचा मृत्यू.एक जखमी भोकर येथील घटणा
आधुनिक केसरी न्यूज  भोकर :  रविवारी ( ता.२६) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली होती.रात्री ९...
​गोंदियात उपवर्गीकरणा विरोधात भीमगर्जना, बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करण्या
तिहेरी खुन प्रकरणातील मुख्य सुत्रधार साई गँगचा सुत्रधार, साई उर्फ साईलाला गहेरवार व  नितेश इंगळे यास वाराणसीत अटक 
Breking News : भ्रष्टाचारी चार आयएएस अधिकाऱ्यांचे प्रकरण उघड करणार : नाना पटोले 
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राजमाता राणी हिराई सोहळ्याला गालबोट लावले ; आदिवासी समाजाच्या वतीने तीव्र निषेध
हडसणी फाट्यावर भीषण अपघात, भरधाव कारने दोन दुचाकींना उडवले ४ जण ठार : एकाची प्रकृती चिंताजनक
महिला आरक्षणावर खुल्या चर्चेस काँग्रेस तयार; मुख्यमंत्र्यांनी सांगावे कधी व कुठे चर्चा करायची? मोदींनाही चर्चेला बोलवा: खा. प्रणिती शिंदे