रामाळा तलाव स्वच्छतेसाठी शिवसेनेचा मनपा आयुक्तांना 24 तासांचा अल्टिमेटम 

रामाळा तलाव स्वच्छतेसाठी शिवसेनेचा मनपा आयुक्तांना 24 तासांचा अल्टिमेटम 

आधुनिक केसरी न्यूज 

चंद्रपूर, दि. १८/५/२०२६ चंद्रपुरातील भानापेठ प्रभागाअंतर्गत येत असलेल्या रामाळा तलावाच्या स्वच्छते करिता तलावातील पाणी सोडण्यात आले आहे. परंतु हे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून तलावातील पाण्याच्या कमतरतेमुळे तसेच इतर काही कारणांमुळे तलावातील मासोळ्या मरत असल्याचे आढळून आले आहे. परिणामतः या परिसरामध्ये अतिशय दुर्गंधी पसरलेली असून रोगराई वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.या सर्व पार्श्वभूमीवर चंद्रपूर शिवसेनेतर्फे चंद्रपूर मनपा आयुक्तांना 24 तासाचा अल्टिमेटम देण्यात आला असून येत्या 24 तासात रामाळा तलाव स्वच्छ न केल्यास व यात मृत पडलेल्या मासोळ्यांची योग्य विल्हेवाट न लावल्यास परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने तलावातील मृत पडलेल्या मासोळ्या उचलून त्या चंद्रपूर मनपा कार्यालय प्रांगणात आणून टाकण्यात येतील असा इशारा देण्यात आला आहे. 

या विषयाकडे तातडीने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी अपेक्षा शिवसेनेचे ललित कासट यांनी या पत्रातून व्यक्त केली आहे.चंद्रपूर मनपा आयुक्त यांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांच्या व्हाट्सअप वर हे पत्र पाठविण्यात आले असल्याचे ललित कासट यांनी सांगितले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

रामाळा तलाव स्वच्छतेसाठी शिवसेनेचा मनपा आयुक्तांना 24 तासांचा अल्टिमेटम  रामाळा तलाव स्वच्छतेसाठी शिवसेनेचा मनपा आयुक्तांना 24 तासांचा अल्टिमेटम 
आधुनिक केसरी न्यूज  चंद्रपूर, दि. १८/५/२०२६ चंद्रपुरातील भानापेठ प्रभागाअंतर्गत येत असलेल्या रामाळा तलावाच्या स्वच्छते करिता तलावातील पाणी सोडण्यात आले आहे....
चाकू हल्ल्यातील आरोपी अद्याप फरार 
खरीप २०२५ पीकविमा; ₹३३६ कोटी वितरित करण्याचे आदेश आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्रानंतर जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई
दोन कोटींचा खंडणीसाठी फर्निचर मॉल वर गोळीबार
सगरोळी येथे ओव्हरलोड  रेतीच्या हायवाखाली चिरडून एकाचा मृत्यू ;स्थानिक नागरीकांचा प्रशासना विरुद्ध प्रचंड संताप
बीएसएफ जवानाने थेट पिस्तूल काढून गोळीबार केला, एका व्यक्तीच्या हनुवटीला लागली गोळी
‘NEET’ पेपरफुटी प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे भाजपा सरकारविरोधात तीव्र आंदोलन