भीम जयंती मिरवणुकीत वाहन घुसल्याने एकाचा मृत्यू.एक जखमी भोकर येथील घटणा
आधुनिक केसरी न्यूज
भोकर : रविवारी ( ता.२६) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली होती.रात्री ९ वाजताच्या दरम्यान अचानक एक चारचाकी वाहन घुसल्याने एकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शहरात सार्वजनिक भीम जयंती महोत्सव समितीच्या वतीने प्रमुख मार्गाने विविध वसाहतीतील मधील बौद्ध बांधवांनी देखाव्यासहित दाखल झाले होते.शहिद प्रफुल्ल नगर येथील मिरवणूक उड्डाणपूलावरून येत असताना रविवारी रात्री ९ वाजता अचानक भरधाव वेगाने येणारे पिकप बेलोरो वाहन क्रमांक (एमएच२६ सीएच३७४१) घुसल्याने संदीप भीमराव गायकवाड वय ४१ रा.शहिद प्रफुल्लनगर भोकर) हा गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी नांदेडलख नेत असताना वाटेतच मृत्यू झाला तर खडकेश्र्वर भारत जिल्हेवाड हा गंभीर जखमी झाला आहे.ऊपस्थित भीमसैनिकानी चालकास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
कारच्या धडकेत ५ जण जखमी
भोकर लगत असलेल्या सुधा प्रकल्पा लगत रविवारी (ता. २६) सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान दोनकारची समोरासमोर धडक झाल्याने बीडीओ, नायब तहसीलदारासह पाच जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.कार क्रमांक (एमएच २६/बीएक्स ६५०८) मधील येथील गटविकास अधिकारी माधव केंद्रे, दत्ता महाजन करपे (रा हळदा ता.भोकर), कार क्रमांक ( एमएच३४/बीआर ७९६३) मधील सपन महेंद्र गडमवाड,रेणुका सपन गडमवाड,हेत्विक गडमवाड जखमी झाल्याची घटना घडली आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List