नांदेड महापालिका स्थायी समिती सभापती म्हणून गाडीवाले यांची बिनविरोध निवड 

नांदेड महापालिका स्थायी समिती सभापती म्हणून गाडीवाले यांची बिनविरोध निवड 

आधुनिक केसरी न्यूज 

नांदेड : वाघाळा महापालिकेच्या स्थायी समिती सभापती भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक विरेंद्रसिंग गाडीवाले यांची बिनविरोध निवड झाली असून अनधिकृत घोषणा उद्या २४ मार्च रोजी सकाळी स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात येणार आहे. विरोधी पक्षाच्या एकाही सदस्याने उमेदवारी अर्ज दाखल केला नसल्यामुळे निवडीची फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे. 
नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या स्थायी समितीची उद्या २४ मार्च रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या उपस्थितीत बैठक बोलाविण्यात आली असून ते पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे स्थायी समितीत स्पष्ट बहुमत असल्यामुळे एकमेव नगरसेवक विरेंद्रसिंग गाडीवाले यांनी सभापती पदासाठी अर्ज दाखल केला आहे. विरोधी पक्षाच्या एकाही सदस्याने सभापती पदासाठी अर्ज दाखल केला नसल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक विरेंद्रसिंग गाडीवाले यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विभागीय आयुक्तांनी स्थायी समितीच्या सभापतींच्या निवडीची तारीख घोषित केली होती. त्यानुसार उद्या २४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस पिठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी राहुल कर्डीले हे असणार आहेत.  त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत निवडीची औपचारिक घोषणा करण्यात येणार आहे. सभागृहात 
भारतीय जनता पक्षाचे १० स्थायी समिती सदस्य आहेत. तर एम आय एम व लोकन्याय आघाडीचे तीन असे १६ सदस्य निवडून आले आहेत. सभागृहात भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीचे स्पष्ट बहुमत असून सभापती म्हणून अनुभवी नगरसेवक विरेंद्रसिंग गाडीवाले यांची निवड होणार असून महापालिकेच्या चाव्या त्यांच्या हातात असणार आहेत. यापूर्वी ही गाडीवाले यांनी सभापती म्हणून काम केलेले आहे. गाडीवाले यांचा अनुभव व संयमी स्वभाव पाहता माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण हे त्यांच्या नावाला हिरवा कंदील दाखविला आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

श्री राम नवमी उत्सवानिमित्त; श्रींचे मंदिर दोन दिवस रात्रभर खुले  श्री राम नवमी उत्सवानिमित्त; श्रींचे मंदिर दोन दिवस रात्रभर खुले 
आधुनिक केसरी न्यूज  शेगांव दि.२३ श्री संत गजानन महाराज संस्थान शेगांवच्या वतीने श्रीं राम नवमी उत्सवा करिता श्री चे मंदिर...
जिल्ह्यात पेट्रोल डिझेलची कुठलीही टंचाई नाही
दुसरबीडमध्ये रक्तरंजित संघर्ष; तंटामुक्ती अध्यक्षांच्या घरावर जीवघेणा हल्ला, ५ ते ६ जण गंभीर
नांदेड महापालिका स्थायी समिती सभापती म्हणून गाडीवाले यांची बिनविरोध निवड 
हर्षवर्धन सदगीर यंदाचा महाराष्ट्र केसरी; दुसऱ्यांदा मानाच्या किताबावर नाव
किशोर बारवकर, आमदार किशोर आप्पा पाटील यांचे विश्वासू लढवय्या आणि उपनगराध्यक्ष
शेततळ्यात पडून तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू