विधानभवनात पत्रकारांच्या घरांच्या प्रश्नांवर बैठक; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तातडीने तोडगा काढण्याचे निर्देश
आधुनिक केसरी न्यूज
संदीप शेलार
मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्यात विधान परिषदेत पत्रकारांच्या विविध समस्यांसह म्हाडाच्या घरांबाबतचे प्रश्न उपस्थित झाल्यानंतर या विषयावर विधानभवनातील समिती सभागृहात विशेष बैठक घेण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत पत्रकारांच्या घरांसंदर्भातील प्रश्न तातडीने मार्गी लावण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले.
बैठकीदरम्यान ठाणे येथील किसन नगर तसेच कोलशेत परिसरातील आशर सोसायटीमधील पूर्ण पैसे भरलेल्या सदस्यांना म्हाडामार्फत तातडीने घरांचे हस्तांतरण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. तसेच या प्रकल्पाशी संबंधित इतर प्रलंबित प्रश्नही प्राधान्याने सोडवण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.दरम्यान, पुढील महिन्यात होणाऱ्या टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या पुरस्कार सोहळ्याच्या प्रोमोचे अनावरणही यावेळी करण्यात आले, या प्रसंगी नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता, म्हाडाचे अध्यक्ष संजीव जयस्वाल, टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष पत्रकार उदय जाधव, मनाली पवार, पंकज दळवी, ठाणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, दिलीप शिंदे, दैनिक आधुनिक केसरीचे पुणे जिल्हा प्रतिनिधी संदीप शेलार यांच्यासह पत्रकार बंधू-भगिनी उपस्थित होते.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List