बारामती-पारवडी मार्गावर समोरा समोर धडक मायलेकीचा जागीच मृत्यू! पती आणि मुलगा गंभीर जखमी!

बारामती-पारवडी मार्गावर समोरा समोर धडक मायलेकीचा जागीच मृत्यू! पती आणि मुलगा गंभीर जखमी!

आधुनिक केसरी न्यूज 

निलेश मोरे

भिगवण : दि.५काल रात्री बारामती पारवडी मार्गावर दुचाकी आणि चारचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी आणि दोन मुलं गंभीर जखमी झाले. यात पत्नी आणि मुलीचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला असून पती आणि मुलगा गंभीर जखमी अवस्थेत आहे.

पाच वर्षाची सानवी मयूर कोकणे व तिची आई रूपाली मयूर कोकणे या दोघींचा या घटनेत दुर्दैवीरित्या मृत्यू झाला असून, मयूर कोकणे व त्यांचा दोन वर्षाचा मुलगा या घटनेमध्ये गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात तातडीने हलवण्यात आले आहे. ही घटना काल रात्री उशिरा बारामती पारवडी रस्त्यावर घडली.

दुचाकीवरून कोकणे कुटुंब बारामतीकडून पारवडीच्या दिशेने चालले होते. याच वेळी बारामती कटफळ पारवडी मार्गावर परीट वस्ती लगत खडकी कडून बारामतीच्या दिशेने येणाऱ्या चारचाकी वाहनाची दुचाकीला जोरदार धडक बसली. या घटनेत मायलेकीचा मृत्यू झाला तर ग्रामस्थांनी तातडीने धावपळ करत गंभीर जखमी झालेल्या मयूर कोकणे व त्यांच्या दोन वर्षाच्या मुलाला दवाखान्यामध्ये नेले. अपघात झाल्यानंतर चारचाकी वाहन चालकाने गाडी तेथेच सोडून पलायन केल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोचून पंचनामा केला व वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. दरम्यान या घटनेमुळे या रस्त्यावरील वाहतूक किती धोकादायक पातळीवर पोहोचली आहे याचा अंदाज आला असून नागरिकही हतबल झाले आहेत.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

दुबईत अडकलेल्या बुरेवार कुटुंबाला मदतीचा हात; अखेर मुंबईत सुखरूप आगमन दुबईत अडकलेल्या बुरेवार कुटुंबाला मदतीचा हात; अखेर मुंबईत सुखरूप आगमन
आधुनिक केसरी न्यूज   चंद्रकांत पतरंगे  गडचिरोली : आखाती देशांतील तणावपूर्ण परिस्थितीमुळे दुबई येथे अडकलेल्या गडचिरोलीतील बुरेवार कुटुंबाला स्थानिक पातळीवर मिळालेल्या...
बारामती-पारवडी मार्गावर समोरा समोर धडक मायलेकीचा जागीच मृत्यू! पती आणि मुलगा गंभीर जखमी!
तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू; या घटनेने आरोग्य विभागाचे पितळ उघड
वैनगंगा नदीत होळीच्या दिवशी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू… आरमोरी परिसर शोकसागरात; इंजिनिअर तरुण शुभम रामटेकेचा बुडून अंत..!
आखाती संघर्षाची झळ गडचिरोलीपर्यंत; दुबईत अडकलेल्या बुरेवार कुटुंबासाठी तातडीच्या हस्तक्षेपाची गरज
शाळा बंदीचा निर्णय लवकर मागे घ्या; शिक्षक, पालक, विविध संघटना रस्त्यावर 
जिवंत असूनही असहाय! कोमात असलेल्या वृद्ध महिलेसाठी बँक ठरली अंतिम थांबा..!