राष्ट्रीय महामार्गावर ६६ लाख ९८ हजार रुपयाचा प्रतिबंधित गुटखा आणि वाहन केले जप्त; यवतमाळ एलसीबीची धडक कारवाई.!
आधुनिक केसरी न्यूज
राजीव आगरकर
पांढरकवडा : यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने आंतरराज्यीय गुटका तस्करीचे रॅकेट उध्वस्त करत मोठी कारवाई केली आहे.तेलंगणातून महाराष्ट्रात अवैधरीत्या विक्रीसाठी आणला जाणारा तब्बल ६५ लाख ९८ हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटका आणि वाहन पोलिसांनी जप्त केले आहे.ही कारवाई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर पांढरकवडा नजीकच्या ढोकी गावाजवळ करण्यात आली.स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की,तेलंगणा राज्याकडून एका आयशर ट्रकमधून (यु.पी-९४-ए.टी-२३०५) प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक होत आहे.या माहितीवरून पथकाने दि.२७ डिसेंबर २०२५ रोजी पांढरकवडा परिसरातील ढोकी गावाजवळ सापळा रचला.संशयित आयशर ट्रक येताच पोलिसांनी तो अडवला.तपासणी केली असता त्यात महाराष्ट्रात बंदी असलेला 'सागर' पान मसाला आणि 'एसआर-१' तंबाखूची १८० पोती आढळून आली.पोलिसांनी ४५ लाख ९२ हजार रुपयांचा गुटका, २० लाख रुपयांचा आयशर ट्रक आणि ६ हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ६५ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालक मोहन सियाराम यादव (२६) आणि क्लिनर बुद्धा बाबूसिंग परिहार (३५) हे दोघेही रा.शिवपुरी,मध्य प्रदेश) यांना ताब्यात घेतले आहे.पुढील तपास पांढरकवडा पोलीस करत आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता,अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात,एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दत्ता पेंडकर,पोउपनि धनराज हाके,गजानन राजामलू,तसेच अंमलदार सुनील खंडागळे,सुधीर पांडे,निलेश निमकर,सुधीर पिदुरकर,सलमान शेख आणि नरेश राऊत यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List