लाईनमनला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी ; गुन्हा दाखल

आधुनिक केसरी

परतूर : शहरात साईबाबा चौकात लाईनमन रामेश्वर भामट हे कर्तव्य बजावत असताना त्यांना शासकिय कामात अडथळा निर्माण करीत शिविगाळ करुन धक्काबुक्की केल्या प्रकरणी पोलिसात एका जणांविरुद्ध गून्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ रामेश्वर भामट यांनी परतूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की वरिष्ठ तंत्रज्ञ परतुर शहरे कार्यालय येथे गेल्या तिन वर्षापासुन नेमणुकीस आहे.परतुर शहर विभागात कार्यरत आहे. दि. 18. मार्च 2025 रोजी दुपारी एक वाजताचे सुमारास साईबाबा चौक भागातील थकीत विजबिल धारकांचे खंडित केलेले विजेचे कनेक्शन जोडुन परत येत असतांना साईबाबा चौकातील रस्त्यावरील एक ग्राहक वीज पुरवठा खंडित केल्याने तो पुर्नजोडणी बाबत चौकशी करित होता. तेव्हा त्याठिकाणी ईसम नामे सोन्यासिंग टाक रा.परतुर हा माझ्या जवळ आला. त्याने लाईनमनच्या हातातील वीजच्या ग्राहकांची यादी व पेन हातातुन हिसकावुन घेऊन अशोक मधुकर माठे रा.सेलु रोड परतुर या नावाचे विजेचे कनेक्शन वापरतो तु वीज पुरवठा खंडित का केला. असे विचारले असता तेव्हा  त्यास म्हणालो 7340 रुपये वीज बिल थकीत असल्याने विजेचे कनेक्शन कट केले आहे. असे म्हणताच सोन्यासिंग टाक याने शासकिय कामात अडथळा निर्माण करुन शिविगाळ करुन धक्काबुक्की केली. मोटारसायकल ढकलुन दिली. विजेचे कनेक्शन जोडले नाही. तर तुझे हात पाय तोडून टाकून जिवे मारुन टाकतो अशी जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. याप्रकरणी वरिष्ठ तंत्रज्ञ रामेश्वर भामट यांच्या फिर्यादीवरून सोन्यासिंग टाक रा.परतूर यांच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अशोक गाढवे हे करीत आहेत. 

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

तिरोडा तालुक्यात बालविवाह थांबला..! तिरोडा तालुक्यात बालविवाह थांबला..!
आधुनिक केसरी न्यूज गोंदिया: बालविवाह करणे हा गुन्हा आहे. बालविवाहा विरुद्ध अनेक कडक कायदे असूनही, बालविवाह अजूनही होत आहेत. १४...
गेवराई बाजारातून कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २३ जनावरांची सुटका; जालना येथील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
जवखेडा येथील सरपंच कैलास पवार यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
नैसर्गिक अनुदान घोटाळा, 1.30 कोटींचा अपहार करणारा तलाठी प्रवीण सिनगारे अटकेत
सरकारी नोकरीच्या अमिषाने दहा लाखाचा गंडा
मुलाच्या लग्नाच्या आहेराची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत
डाऊच फाटा नजिक भरधाव डंपरची तिघांना जोरदार धडक,एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी..!