वाल्मिक कराडवर सुप्रियाताईंचे मोठे भाष्य ...ED ची कारवाई ...

वाल्मिक कराडवर सुप्रियाताईंचे मोठे भाष्य ...ED ची कारवाई ...

आधुनिक केसरी न्यूज 

मुंबई : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत असलेला आरोपी वाल्मिक कराडला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने यापूर्वीच नोटीस दिली होती. मात्र, कुठलीही कारवाई न झाल्याने वाल्मिक कराड बिनधास्त असून वेळेवर ईडीने कारवाई केली असती तर सरपंच हत्याप्रकरण घडलंच नसतं, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या की, मागील एक महिना बीड आणि परभणी घटनेबाबत आमचे लोक बोलत आहेत. संसदेत पहिला आवाज या विरोधात बजरंग सोनवणे यांनी उठवला होता. तर, या विरोधात जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर हेही सातत्याने बोलत आहेत, त्यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, अद्यापही वाल्मिक कराडवर ईडीची कारवाई का झाली नाही, असा सवाल सुप्रियाताई सुळे यांनी विचारला आहे.  

सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, बीड हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी संसदेत बजरंग सोनवणे यांनी केली. संदीप क्षीरसागर यांनी सभागृहात विषय मांडला, जितेंद्र आव्हाड यांनी देखील मांडला. मागील 30 दिवस ते बोलत आहेत. माणुसकीच्या नात्याने आपण सर्वजण एकच म्हणत आहोत की, पीडित देशमुख कुटुंबाला न्याय मिळायला हवा. मी अनेक वर्षे संसदेत काम करत आहे. पीएएमएले कायदा आला, यामधे खंडणी प्रकरणी कायद्यात तरतुदी आहेत. मला सरकारला प्रश्न विचारायचा आहे की, इडी हे केंद्रासाठी काम करत. वाल्मिक कराड यांच्या नावाने एक कागद आहे, पीएमएलए कायद्याअंतर्गत एक नोटीस यांना आली आहे, असे म्हणत सुप्रियाताई सुळेंनी ती नोटीसच पत्रकार परिषदेत दाखवली. मात्र, अद्यापही त्या अंतर्गत कारवाई होत नसल्याचं त्यांनी सांगितलं. 

पुढे बोलताना सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की , वाल्मिक कराडची अटक खंडणी प्रकरणी झाली असून गुन्हा दाखल आहे. मग पीएमएलए कायदा का लागू केला नाही? ११ डिसेंबर एफआयआर आहे, त्यात वाल्मिक कराडच नाव आहे. आवादा कंपनीने हा गुन्हा दाखल केला आहे. त्यासंदर्बात ईडीकडून नोटीस आहे. मग, खंडणीची नोटीस असताना त्यांच्यावर कारवाई का नाही? एकीकडे तुम्ही नुसत्या आरोपांवर गुन्हा दाखल करता आणि इथ केस आहे, तिसरी एफआयआर दाखल केली आहे. मग वाल्मिक कराडवर ईडीची कारवाई का झाली नाही? जर आधीच वाल्मिक कराडवर कारवाई झाली असती, तर संतोष भाऊ यांची हत्याच झाली नसती असेही सुप्रियाताई सुळे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.  

लाडली बहीण योजना परळी तालुका अध्यक्ष वाल्मिक कराड आहे. ज्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे, त्याला तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष करता? अनिल देशमुख, संजय राऊत नवाब मलिक याना एक कायदा आणि वाल्मिक कराडला वेगळा कायदा का? असे प्रश्न सुप्रियाताई सुळे यांनी पत्रकार परिषदेत विचारले आहेत. 

यावर सविस्तर बोलताना सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, अंजली दमानिया यांनी सुद्धा काही प्रश्न उपस्थित केले काही प्रश्नांची उत्तरे मिळाली. माझे काही प्रश्न आहे. पीएमएलएचा कायदा आणला तो काळा पैसा आणण्यासाठी आणला गेला होता. पीएमएमएल हा खंडणीसाठी सुद्धा लागू होतो असे दिसून येते. हे प्रकरण अर्थ खात्याच्या अंतर्गत येतो. वाल्मिक कराडच्या नावाने ईडीची नोटीस आहे. पीएमएलएचे अनेक केसेस झाल्या आहे. वाल्मिक कराडला पीएएमएलए आणि ईडीची कलमे का लावली नाही, असे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.

या प्रकरणात मी आणि खासदार बजरंग बाप्पा अर्थ मंत्र्यांना ईडी कारवाईबाबतही पत्र लिहिणार आहोत. ही अशी खंडणी उकळली जात असेल तर कंपन्या गुंतवणूक कशी करणार, वाल्मिक कराडला स्पेशल ट्रीटमैंट का? जर कारवाई झाली असती तर संतोष भाऊ वाचले असते असेही सुप्रियाताई सुळे यांनी बोलताना म्हटले आहे.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

एसटीच्या परतवाडा आगाराचे  मद्यपी व्यवस्थापक निलंबित सुलक्षा व दक्षता विभागाची कारवाई एसटीच्या परतवाडा आगाराचे  मद्यपी व्यवस्थापक निलंबित सुलक्षा व दक्षता विभागाची कारवाई
आधुनिक केसरी न्यूज रत्नपाल जाधव  मुंबई : (७ नोव्हेंबर) अमरावती विभागातील परतवाडा आगार व्यवस्थापक जीवन दत्तात्रय वानखेडे यानी  कर्तव्यावर असताना...
वाळू माफियांचे धाबे दणाणले, सायगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर बदनापूर पोलिस आणि महसूल विभागाची मोठी कारवाई
मुलाच्या नावाने पुण्यात ४० एकर सरकारी जमीन हडपणाऱ्या अजित पवारांची मंत्रीमंडळातून हाकालपट्टी करा: हर्षवर्धन सपकाळ
शिवसेना इच्छुक उमेदवारांच्या  शुक्रवार पासून मुलाखती; जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांची माहिती
मदनवाडी येथे उसाने भरलेल्या ट्रॅक्टरखाली युवक ठार
निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?, आयोगाने जबाबदारीपासून पळ काढला : हर्षवर्धन सपकाळ
हदगाव येथील दत्तबर्डी येथे श्री दत्तप्रभू मुर्तीचा जीर्णोध्दार सोहळा!