जोरगेवार स्वगृही परतले ;भाजपा परिवारात उत्साहाचे वातावरण...

जोरगेवार स्वगृही परतले ;भाजपा परिवारात उत्साहाचे वातावरण...

आधुनिक केसरी न्यूज 

चंद्रपूर : कुटुंब म्हटलं, परिवार म्हटला की त्यात कुरबुरी या चालणारच, वादावादी या होणारच. दोन संख्या भावांमध्ये सुद्धा वादावादी होत असतेच, कुरबुरी चालत असतातच. भारतीय कौटुंबिक व्यवस्थेचा हा जणू एक अविभाज्य भागच आहे. म्हणून तर ' घर म्हंटल की भांड्याला भांड हे लागणारच " ही म्हण सुद्धा आपल्याकडे परिचित आहेच. परंतु हेही तेवढेच खरे की, जेव्हा कधी कुटुंबावर संकट येतं तेव्हा आपल्या वैयक्तिक कुरबुरी आणि वाद बाजूला ठेवत सर्व परिवार एकत्र येतो आणि हाच भारतीय कुटुंब व्यवस्थेचा कणा आहे, हीच भारतीय संस्कृती. कुटुंब व्यवस्थेचा हाच कणा , हाच आदर्शभाव चंद्रपूर विधानसभेमध्ये पहावयास मिळाला. निमित्त होतं जोरगेवारांच्या भाजप प्रवेशाच. स्थानिक एनडी हॉटेल येथे भाजपा द्वारा आयोजित या स्नेहसोहळ्याला हा योग जुळून यावा यासाठी अथक परिश्रम घेणारे भूतपूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, महाराष्ट्राचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रमोद कडू विजय राऊत, असे परिवारातील सर्व ज्येष्ठ सदस्य उपस्थित होते.

किशोर जोरगेवार हे पूर्वाश्रमीचे भाजपाच्या परिवारातील सदस्य. एवढेच नव्हे तर भाजपाचे महाराष्ट्रातील वर्तमानातील हेवीवेट मंत्री असलेले सुधीर मुनगंटीवार यांचे अत्यंत विश्वासू म्हणून किशोर जोरगेवार यांना तेव्हा ओळखलं जायचं. किशोर जोरगेवार हे सुद्धा सुधीर मुनगंटीवार यांना आपले राजकीय गुरू मानतात. भाजपा परिवारामध्ये या दोघांना कोणे एकेकाळी राम लक्ष्मणाची जोडी म्हणूनही ओळखले जायचे. परंतु राजकीय सारीपाटावरील काही अनपेक्षित खेळीमुळे दोघात तिसऱ्याच आगमन झालं आणि भाजपा राजकीय परिवारात कुरबुरी वाढायला लागल्या. आणि याच कुरबुरीमुळे जोरगेवार हे या कुटुंबाचा अविभाज्य भाग असले तरी काही काळासाठी परिवारातून बाहेर पडले होते. परंतु संकटसमयी कुटुंबासोबत उभे राहणार नाहीत ते जोरगेवार कसले? म्हणूनच ज्येष्ठांनी काढलेली समजूत, दोन नेत्यांमधील कोणाचे दोन पाऊल मागे तर कोणाचे दोन पाऊल पुढे येत येत आपल्या कौटुंबिक वादाला पूर्णविराम देत जोरगेवार स्वगृही परतले आहेत. तर ज्येष्ठ बंधू सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा जुने सगळे मतभेद बाजूला ठेवत त्यांचा खुल्या मनाने कुटुंबात प्रवेश करून घेतलेला आहे. आपल्याच परिवारातील एक सदस्य स्वगृही परत आल्याने भाजपा परिवारामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण भाजपा परिवार आता जोरगेवारांच्या पाठीशी उभा राहत त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असे चिन्ह दिसत आहेत. जोरगेवारांच्या स्वगृही परतण्याची सुवार्ता संपूर्ण महाराष्ट्रात पाहता पाहता पसरली आणि जोरगेवारांवर  आता सर्वत्र अभिनंदनचा वर्षाव होत आहे. 

राजकीय सारीपाटावरील या अनपेक्षित खेळीमुळे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेला चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ आता पुन्हा एकदा नव्याने आपला डाव मांडणार आहे. या डावामुळे विरोधकांमध्ये मात्र चांगलाच हडकंप  माजला असून राम लक्ष्मणाची ही जुनी जोडी आता पुन्हा एकदा राजकीय सारीपाटावर नवा इतिहास घडवणार का? हत्ती , वजीर, उंट, घोडे आणि आपल्या सैन्याच्या साथीने विरोधकांवर कशी चाल करतात याकडे आता महाराष्ट्रातील धुरंधर धुरीणांचं लक्ष लागले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

काँग्रेसची नाळ सामान्य माणूस आणि शेतकऱ्यांबरोबर : सतेज पाटील काँग्रेसची नाळ सामान्य माणूस आणि शेतकऱ्यांबरोबर : सतेज पाटील
आधुनिक केसरी न्यूज कुडूत्री : काँग्रेस सामान्य माणूस आणि शेतकऱ्याबरोबर आहे.काँग्रेस पक्ष जनतेचे हित साधू शकतो. सध्याचे सरकार यांना शेतकऱ्यांची...
अंढेरा शिवारात जुळ्या मुलींची गळा चिरून निर्घृण हत्या, आरोपी पित्याने वाशीम पोलिसात केले आत्मसमर्पण
दाजीपूर अभयारण्य सफारी अखेर सुरू! गोकुळचे संचालक अभिजीत तायशेटे यांच्या मागणीला यश
भिगवण मध्ये चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आला गर्भवती महिलेचा मृतदेह ; उडाली एकच खळबळ
भिगवण पोलिसांची दिपावलीपूर्वीची धडाकेबाज कारवाई! अट्टल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या, 1 लाख रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत
धक्कादायक : पोषण आहाराच्या पॅकेटमध्ये सापडला मेलेला उंदीर - देवरी तालुक्यातील अतिदुर्गम धवलखेडी येथील धक्कादायक प्रकार..!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंचाहत्तरीनिमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!