सृजन मुक्त अंगणाच्या व्यासपीठावरून दत्ताजी यांना पहिला गोंडवन भूषण पुरस्कार प्रदान

सृजन मुक्त अंगणाच्या व्यासपीठावरून दत्ताजी यांना पहिला गोंडवन भूषण पुरस्कार प्रदान

आधुनिक केसरी न्यूज 

चंद्रपूर : सृजन मुक्त अंगणाच्या व्यासपीठावरून जुही बेहार हिच्या संचालनातर्गत दिवंगत इतिहास अभ्यासक दत्ताजी तनिरवार यांना अण्णाजी  जयराम राजूरकर स्मृती प्रतिष्ठान...सृजन चंद्रपूर आणि समस्त चंद्रपूरकरातर्फे पहिला मरणोत्तर  गोंडवन भूषण पुरस्कार व्यासंगी लेखक डॉ.श्याम मोहरकर यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात आला जो दत्ताजी चे चिरंजीव  प्रभातकुमार उर्फ अरुण यांनी स्वीकारला.याच वेळी डॉक्टर मोहरकर यांच्या अध्यक्षतेखाली दत्ताजी वरील गौरव ग्रंथाचे प्रकाशन वरोड्याच्या लोकमान्य महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर प्रा जयश्री शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे मानव्य शास्त्र व सामाजिक विज्ञान विभागात अधिष्ठाता असलेले डॉक्टर श्यामराव कोरेटी विशेष अतिथी म्हणून आणि खगोलशास्त्रज्ञ् व पर्यावरण अभ्यासक सुरेश चोपने मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. 

गौरव ग्रंथाचे संपादक अमित भगत पण यावेळी उपस्थित होते.. साऱ्या अतिथीनि यावेळी दत्ताजी यांच्या कार्याचा गौरव करीत त्यांच्या असामान्यतेवर शिक्कामोरतब केले. अमित भगत यांनी गौरव ग्रंथामागील आपली भूमिका सांगितली तर गौरव ग्रंथाचे मुखपृष्ठकार सुदर्शन बारापात्रे यांनी आपली भूमिका मांडली. प्रभातकुमार उर्फ अरुण यांनी या वेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. उपस्थित साऱ्या रसिकाना यावेळी निशुल्क गौरव ग्रंथाचे वितरण करण्यात आले. बाबू आयटम प्रकाशनामुळे दत्ताजी ना खरी ओळख मिळाली असे यावेळी डॉक्टर मोहरकर म्हणाले तर डॉक्टर जयश्री शास्त्री यांनी गौरव ग्रंथ आता पुढील पिढ्यासाठी ऐतिहासिक दास्तावेज झाला असल्याचे प्रतिपादान करीत प्रीती नवघरे यांनी दत्ताजी च्या काढलेल्या रांगोळीचे कौतुक केले. वाचन संस्कृती विकसित व्हावी नवनवीन इतिहासावर लिहणारे तयार व्हावेत अशी पण अपेक्षा त्यांनी  व्यक्त केली. कोरेती आणि चोपने यांनी यावेळी दत्ताजी यांच्या कार्याचा आढावा घेतला.स्वाती घरोटे हिने मान पत्राचे वाचन केले. लेखक कवी पत्रकार गृहिणी इतिहास अभ्यासक यांचे लेख या गौरव ग्रंथात आहेत. भर पावसात पण कार्यक्रमाला रसिकाची उल्लेखनीय हजेरी होती.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

शिळवणी येथे वीज पडून १६ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू शिळवणी येथे वीज पडून १६ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
आधुनिक केसरी न्यूज  देगलूर : तालुक्यातील शिळवणी येथे आज, सोमवार दि. १६ मार्च २०२६ रोजी निसर्गाचा भीषण कोप पाहायला मिळाला....
विधानभवनात पत्रकारांच्या घरांच्या प्रश्नांवर बैठक; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तातडीने तोडगा काढण्याचे निर्देश
आडगाव येथे जखमी अवस्थेत हरणास दिले जीवनदान
चंद्रपूर मनपा स्थायी समितीच्या सभापतीपदी मनस्वी गिऱ्हे यांची निवड.
वरोड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा थरार ; बनावट दारूसह १२ लाखांच्या मुद्देमाल जप्त
अफवांमुळे एचपीव्ही लसीकरणाकडे पालकांची पाठ; जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जयश्री भुसारे यांची वाकुळणी येथे तपासणी
मोहफूल वेचणाऱ्या बालकावर अस्वलाचा हल्ला