लोंबकळलेल्या विजतारांनी घेतला शेतकऱ्याचा जीव.; दोंदवाडे येथील दुर्घटना

लोंबकळलेल्या विजतारांनी घेतला शेतकऱ्याचा जीव.; दोंदवाडे येथील दुर्घटना

आधुनिक केसरी न्यूज 

 गोकुळसिंग राजपूत 

पहूर .: कपाशीच्या शेतात कोळपणी करण्यासाठी जात असताना लोंबकळलेल्या वीजतारांना  कोळप्याच्या लोखंडी दांड्याचा स्पर्श झाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू  झाल्याची दुर्दैवी घटना जामनेर तालुक्यातील दोंदवाडे येथे एकूलती शिवारात आज शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली .
         याबाबत सविस्तर वृत्त असे की , सध्या सर्वत्र शेती कामांना वेग आला आहे .दोंदवाडे येथील माजी ग्रामपंचायत सदस्य तथा प्रगतिशील शेतकरी शिवाजी गरबड पाटील ( वय - ५५ वर्षे ) हे त्यांच्या कपाशीच्या शेतात कोळपणी करण्यासाठी जात होते . त्यांनी कोळपे खांद्यावर घेऊन शेतात प्रवेश करताच लोंबकळलेल्या विजतारांना त्यांच्या खांद्यावरील कोळप्याच्या लोखंडी दांड्याचा स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा जबर धक्का बसला . विजेच्या धक्क्यामुळे त्यांनी जोरात किंकाळी मारली व ते खाली कोसळले .त्यांच्या आवाजाने त्यांचा मजूर श्री पावरा धावत आला . त्याने आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांना बोलावले .  त्यांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ . संदीप पाटील  यांनी उपचारांती त्यांना मयत घोषित केले . पहूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहे . घटनेची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद कृषी सभापती प्रदीप लोढा , पोलीस पाटील नितीन परदेशी यांच्यासह दोंदवाडे ,  एकूलती, पहूर येथील गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली . याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ .संदीप पाटील यांच्या खबरीवरून पहूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल अरुण पाटील हे करीत आहेत .

महावितरणचे दुर्लक्ष -
महावितरण कंपनीचे शेत शिवारातील वीजतारांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे . वर्षानुवर्षे जीर्ण झालेल्या , लोंबकळणाऱ्या विजतारा शेतकऱ्यांच्या जिवाशीच क्रुर खेळ खेळत असून सदर वीजतारा सुव्यवस्थित करण्याची तसेच निष्पाप मयत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना मदत करण्याची मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे .

प्रगतिशील शेतकरी शिवाजी पाटील हे हसतमुख आणि सर्वांच्या हाकेला ओ देणारे कष्टकरी होते .ज्या शेतात आयुष्यभर कष्ट उपसले त्याच शेतात विजेच्या धक्क्याने अखेरचा श्वास घेतला . ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी लौकिकास्पद कार्य केले . त्यांच्या पत्नी सिंधुबाई पाटील यांनी देखील दहा वर्षे ग्रामपंचायतच्या सरपंच म्हणून पद भूषविले .शेतकरी शिवाजी पाटील यांच्या अकाली निधनाने एकुलती दोंदवाडे परिसरावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे . रात्री ८ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत .

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का? RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?
आधुनिक केसरी न्यूज मुंबई : देशात बेरोजगारीची समस्या सर्वात मोठी असून उच्च शिक्षण घेऊनही तरुणांना नोकरी मिळत नसल्याचे भयावह चित्र...
सातपुड्याच्या डोंगरात दमदार पाऊस ; नदी नाले झाले प्रवाहित
महाराष्ट्रात इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सी सेवेसाठी भाडेदर निश्चित : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती 
अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ’ रेल्वेमार्ग प्रकल्पासाठी १५० कोटी निधी वितरीत;बीडकरांना पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाची भेट
एआय : राजकीय प्रचारयुध्दाची नवी रणभूमी!
मोताळा तहसीलदार दोन लाखांची लाच घेताना पकडला..!
जायकवाडी धरणाचे सर्व 27 दरवाजे उघडले..!