मृग नक्षत्राच्या सरीने बळीराजा सुखावला ; पेरणी पूर्व मशागतीच्या कामांना वेग

मृग नक्षत्राच्या सरीने बळीराजा सुखावला ; पेरणी पूर्व मशागतीच्या कामांना वेग

आधुनिक केसरी न्यूज 

विनोद पाटील बोडखे 
 

रिसोड : तालुक्यात काल दिनाक 10 जून रोजी सायंकाळी सहा वाजता दरम्यान मृग नक्षत्राच्या सरी कोसळल्याने रिसोड तालुक्यातील शेतकरी वर्ग सुखावला आहे. रिसोड तालुक्यातील अनेक गावांमध्ये मान्सून पुर्व पाऊस न झाल्याने शेतातील कामे खोळंबली होती.खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपला तरी मशागतीच्या कामांना   सुरुवात झाली नव्हती. काल मृग नक्षत्राच्या पावसाच्या दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांतून मोठा आनंद उत्साह व्यक्त करण्यात येत असून आज शेतकरी आपल्या खरीप पिकांच्या लागवडीसाठी कामाला लागले असून. लोणी बुद्रुक परिसरात हळद लागवडीला देखील सुरुवात करण्यात आली असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. रिसोड तालुका हा पूर्वी कॉटन बेल्ट म्हणून प्रसिद्ध होता. मात्र हल्ली कपाशीची लागवड मात्र नामशेष झाली असून हा पट्टा सोयाबीन पट्टा म्हणून ओळखल्या जातो. तसेच रिसोड  तालुक्यात सोयाबीन बरोबरच तूर देखील मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते.विशेषतः या परिसरातील तूर ही मोठ्या प्रमाणात प्रथिने असल्याने खण्यास उपयुक्त असल्याने या भागात उत्पादित तुरीला मोठी मागणी आहे.
 शेतकरी कामाला लागला असून गावात मात्र शुकशुकाटाचे वातावरण असून कृषी सेवा केंद्रावर मात्र शेतकऱ्यांची बी बियाणे खते खरेदी साठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. एकंदरीतच  मृग नक्षत्राच्या पावसाने शेतकऱ्यांत आनंद आणि उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.

यावर्षी उन्हाळ्यात एकही अवकाळी पाऊस पडला नाही त्यामुळे शेतातील नागरणी केलेल्या शेताचे ढेकळे अजूनही तशीच होती. काल मृग नक्षत्राचा चांगला पहिलाच पाऊस झाल्याने  पेरणी पूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे.

प्रवीण बोडखे  शेतकरी

काल तालुक्यात दमदार पाऊस झाला या पाऊसाने शेतातील कामे सुरू झाली असून आमच्या भागात हळद लागवडीला देखील सुरुवात झाली आहे. अनेक शेतकरी खरीप पीक पेरणीसाठी आपली शेत तयार करत आहेत.एकंदरीत बळीराजा सुखावला असून एक नवचैतन्याचे वातावरण तयार झाले आहे.

शंकर बोडखे युवा शेतकरी लोणी बु

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

चंद्रपूर जिल्ह्यासाठी 1 व 3 एप्रिल रोजी येलो अलर्ट तर 2 एप्रिल ला ऑरेंज अलर्ट चंद्रपूर जिल्ह्यासाठी 1 व 3 एप्रिल रोजी येलो अलर्ट तर 2 एप्रिल ला ऑरेंज अलर्ट
आधुनिक केसरी न्यूज  चंद्रपूर : नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार चंद्रपूर जिल्ह्यासाठी दिनांक 1 व 3 एप्रिल 2026 रोजी...
नाशिक–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पुन्हा भीषण अपघात मद्यधुंद; कंटेनर चालकाकडून दोन वाहनांना धडक, तिघे जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक
पत्रकारांच्या आक्रमकतेमुळे आणि उपोषणाच्या इशाऱ्यामुळे प्रशासनास जाग
माओवादाविरुद्ध  लढा दिलेल्या सी-60 जवानांना राज्य शासनामार्फत विशेष ‘सी-60 पदक’ देण्यात येणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ग्राहकांना गॅस वितरण घरपोच करावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
पैठण तालुक्यातील श्रीक्षेत्र आपेगावी वडाचे झाड कोसळल्याने गावाचा संपर्क तुटला!
पोलीस प्रशासन व कृषी विभाग यांच्या संयुक्त कारवाईत अनधिकृत कीटकनाशकांचा 5 लाख 47 हजारांचा मुद्देमाल जप्त