मृग नक्षत्राच्या सरीने बळीराजा सुखावला ; पेरणी पूर्व मशागतीच्या कामांना वेग

मृग नक्षत्राच्या सरीने बळीराजा सुखावला ; पेरणी पूर्व मशागतीच्या कामांना वेग

आधुनिक केसरी न्यूज 

विनोद पाटील बोडखे 
 

रिसोड : तालुक्यात काल दिनाक 10 जून रोजी सायंकाळी सहा वाजता दरम्यान मृग नक्षत्राच्या सरी कोसळल्याने रिसोड तालुक्यातील शेतकरी वर्ग सुखावला आहे. रिसोड तालुक्यातील अनेक गावांमध्ये मान्सून पुर्व पाऊस न झाल्याने शेतातील कामे खोळंबली होती.खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपला तरी मशागतीच्या कामांना   सुरुवात झाली नव्हती. काल मृग नक्षत्राच्या पावसाच्या दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांतून मोठा आनंद उत्साह व्यक्त करण्यात येत असून आज शेतकरी आपल्या खरीप पिकांच्या लागवडीसाठी कामाला लागले असून. लोणी बुद्रुक परिसरात हळद लागवडीला देखील सुरुवात करण्यात आली असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. रिसोड तालुका हा पूर्वी कॉटन बेल्ट म्हणून प्रसिद्ध होता. मात्र हल्ली कपाशीची लागवड मात्र नामशेष झाली असून हा पट्टा सोयाबीन पट्टा म्हणून ओळखल्या जातो. तसेच रिसोड  तालुक्यात सोयाबीन बरोबरच तूर देखील मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते.विशेषतः या परिसरातील तूर ही मोठ्या प्रमाणात प्रथिने असल्याने खण्यास उपयुक्त असल्याने या भागात उत्पादित तुरीला मोठी मागणी आहे.
 शेतकरी कामाला लागला असून गावात मात्र शुकशुकाटाचे वातावरण असून कृषी सेवा केंद्रावर मात्र शेतकऱ्यांची बी बियाणे खते खरेदी साठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. एकंदरीतच  मृग नक्षत्राच्या पावसाने शेतकऱ्यांत आनंद आणि उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.

यावर्षी उन्हाळ्यात एकही अवकाळी पाऊस पडला नाही त्यामुळे शेतातील नागरणी केलेल्या शेताचे ढेकळे अजूनही तशीच होती. काल मृग नक्षत्राचा चांगला पहिलाच पाऊस झाल्याने  पेरणी पूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे.

प्रवीण बोडखे  शेतकरी

काल तालुक्यात दमदार पाऊस झाला या पाऊसाने शेतातील कामे सुरू झाली असून आमच्या भागात हळद लागवडीला देखील सुरुवात झाली आहे. अनेक शेतकरी खरीप पीक पेरणीसाठी आपली शेत तयार करत आहेत.एकंदरीत बळीराजा सुखावला असून एक नवचैतन्याचे वातावरण तयार झाले आहे.

शंकर बोडखे युवा शेतकरी लोणी बु

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

चंद्रपूर जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध होणार चंद्रपूर जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध होणार
आधुनिक केसरी न्यूज  चंद्रपूर, दि. 30 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चंद्रपूर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम-2026...
वर्धा पोलीस मुख्यालयातील 'शस्त्र गोळीबार प्रशिक्षण' यशस्वी; अंमलदार संभाजी मुंढकर यांचा गौरव
टाकळीवाडी येथे गॅस वाहिनीला गळती ; समृद्धी महामार्गावरील वाहतूक वळवली
वर्धा राज्यातील पहिले ‘पुस्तकांचे शहर’ होणार : मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत
डीपीच्या शॉर्टसर्किटने चार एकर ऊस जळून खाक
स्मशानभूमीच्या हक्कासाठी निपाणी सावरगावात सरणावर बसून आमरण उपोषण; आज सहावा दिवस, प्रशासनाची उदासीनता कायम
छत्रपती संभाजीनगरची इव्ही हब म्हणून जगात ओळख निर्माण करू : नवीनीकरण ऊर्जा मंत्री अतुल सावे