मालगाडी रुळावरून घसरली ; मोठा अपघात टळला ; बल्लारशा रेल्वे स्टेशन येथील घटना
On
आधुनिक केसरी न्यूज
प्रेम गहलोत
बल्लारपूर : बल्लारपूर येथे अल्ट्राटेक सिमेंट कारखान्यातून सिमेंट घेऊन जाणारी मालगाडी आज दुपारी १२.१५ वाजता अहमदनगरच्या दिशेने जात असताना जी-१३ क्रमांकाची मालगाडी स्टेशन यार्डातून बाहेर पडताच अचानक रुळावरून घसरल्याने मोठा अपघात टळला.
त्यानुसार नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे मार्गावर मालगाडी सुरू होताच मोठा आवाज झाल्याने सर्वत्र घबराट पसरली होती. ही गाडी मंद गतीने रुळावरून घसरली होती. या घटनेमुळे प्रवासी गाड्यांवर कोणताही परिणाम होणार नसून दहा ते बारा तासांनंतर सुधारणा होण्याची शक्यता आहे.
या विषयी स्टेशन मास्टर रविंद्र नंदनवार यांना विचारले असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केले.
Tags:
About The Author
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
01 Jul 2025 19:12:17
आधुनिक केसरी न्यूज लक्ष्मीकांत मुंडे किनवट : तीर्थक्षेत्र उनकेश्वरकडून सकाळी किनवटकडे येणाऱ्या किनवट आगाराच्या बसगाडीची क्रं. एम. एच. ४१ -...
Comment List