आजचे राशीभविष्य: आज 12 पैकी 7 राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल; पहा या सात राशीत तुमची राशी आहे आहे का?

आजचे राशीभविष्य: आज 12 पैकी 7 राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल; पहा या सात राशीत तुमची राशी आहे आहे का?

   आधुनिक केसरी न्यूज

जाणून घ्या कसा आजचा दिवस तुमच्यासाठी....
मेष : शुभ रंगः राखाडी, शुभ अंक : ३

तरूण वर्गाचा आज मौजमजा करण्याकडे कल असेल. स्वतःची हौस भागवण्यासाठी खर्च कराल. गृहीणी आज स्वतःसाठी वेळ काढतील. प्रकृती उत्तम साथ देईल.

वृषभ : शुभ रंगःपांढरा, शुभ अंक : ८

मुलांची अभ्यासात उत्तम प्रगती दिसून येईल. गृहोद्योग चांगले चालतील. गृहीणींना थोडा थकवा जाणवेल. नोकरदारांना ऑफिसला दांडी मारायचा मूड असेल.

मिथुन : शुभ रंगः केशरी, शुभ अंक : १

साहित्यिक मंडळींकडून दर्जेदार लिखाण होईल. गायक कलाकार प्रसिध्दीच्या झोतात येतील. गृहीणी शेजारधर्म जपतील. बेरोजगारांना नोकरीचे कॉल्स येतील.

कर्क : शुभ रंगःस्ट्रॉबेरी, शुभ अंक : ५

आज कार्यक्षेत्रात तुम्ही प्रभावी नेतृत्व कराल. व्यवसायात आवक मनासारखी राहील. नोकरीच्या ठीकाणी एखादी वाढीव जबाबदारी स्विकारावी लागेल. यशदायी दिवस.
सिंह : शुभ रंग: चंदेरी, शुभ अंक : ७

आज कुठेही आपलीच मर्जी चालवण्याचा तुमचा प्रयत्न असेल. आपला मोठेपणा सांभाळण्यासाठी खर्च कराल. फारच सडेतोड बोलून कुणाच्या भावना दुखाऊ नका.

कन्या : शुभ रंग:जांभळा, शुभ अंक : ९

विदेशाशी संबंधीत व्यवसाय उत्तम चालतील. वायफळ खर्चाचे प्रमाण वाढेल. कार्यालयिन कामासाठी दूरचे प्रवास घडतील. प्रवासात आरोग्याची काळजी घ्या.

तूळ : शुभ रंग: आकाशी, शुभ अंक : ३

व्यावसायिक उलाढाल वाढेल. आप्तस्वकिय व जिवलग मित्र तुमच्या शब्दास मान देतील. नवविवाहितांची स्वप्ने साकार होतील. दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित लाभ.

वृश्चिक : शुभ रंगः गुलाबी, शुभ अंक : ५

कार्यक्षेत्रात वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी तुम्ही सज्ज असाल. अधिकारी वर्गास अधिकार वापरावेच लागतील. आज कुसंगती पासून लांबच रहीलेले बरे.

धनु : शुभ रंग: आकाशी, शुभ अंक : ४

नोकरदारांना वरीष्ठांची मर्जी सांभाळणे अवघड होईल. उद्योगधंद्याच्या दृष्टीने काहीसा प्रतिकूल दिवस असून नास्तिकही आज देवाला एखादा नवस बोलून बघतील.
मकर : शुभ रंगः पिस्ता, शुभ अंक : १

विवाह विषयक बोलणी आज नकोत. जास्त लाभाच्या आशेने कुठेही असुरक्षित गुंतवणूक करू नका. आज धाडसाची कामे टाळावीत. झटपट लाभाचा मोह नकोच.

कुंभ : शुभ रंग: मोतिया, शुभ अंक : ६

व्यवसायात वाढत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी तयार रहावे लागेल. कार्यक्षेत्रात काही आव्हानात्मक प्रसंगांना तोंड द्यावे लागणार आहे. पत्नीचे सल्ले मात्र डावलू नका.

मीन : शुभ रंगः निळा, शुभ अंक : २

नोकरदारांसाठी अनुकूल दिवस. वरीष्ठ आज तुमच्या मागण्यांचा सहानुभूती पूर्वक विचार करतील. तुमची काही येणी असतील तर वसूल होण्याची शक्यता आहे.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

जनसामान्यांचा नेता हरवला : पालकमंत्री डॉ.अशोक उईके जनसामान्यांचा नेता हरवला : पालकमंत्री डॉ.अशोक उईके
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने जनसामान्यांचा नेता हरविला आहे. अजित दादांचा स्वभाव हा...
अजित पवार यांचे विमान उडवणारे कॅप्टन सुमित कपूर आणि फर्स्ट ऑफिसर शांभवी पाठक यांचेही दुःखद निधन 
महाराष्ट्राच्या राजकारणातील शिस्तप्रिय, कुशल प्रशासक आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आणि दुःखद 
जनसेवेसाठी तत्पर लोकनेता, सहृदय मित्र गमावला : आ सुधीर मुनगंटीवार यांची शोकभावना
संवेदनशील नेतृत्वाचा अस्त : आ.किशोर जोरगेवार
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत दुःखद निधन
साहित्यकृतींतून जगण्यातील अस्वस्थतेची अभिव्यक्ती -‘लेखक संवाद’ कार्यक्रमात कवी-लेखक प्रभू राजगडकर यांचे प्रतिपादन -पदव्युत्तर मराठी विभागात लेखक संवाद कार्यक्रम