सावधान !! कोरोना हातपाय पसरवतोय; गेल्या 24 तासात धक्कादायक आकडा समोर;तब्बल 'इतक्या'रुग्णांची वाढ; वाचा सविस्तर

सावधान !! कोरोना हातपाय पसरवतोय; गेल्या 24 तासात धक्कादायक आकडा समोर;तब्बल 'इतक्या'रुग्णांची वाढ; वाचा सविस्तर

आधुनिक केसरी न्यूज

मुंबई  : कोरोनाने महाराष्ट्रात  पुन्हा डोकंवर काढले आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 146 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून दररोज कोरोना बाधितांचा आकडा हा 100 पेक्षा जास्त आढळतोय. कोरोनामुळे सध्या तरी घाबरुन जाण्यासारखी परिस्थिती नाहीय. पण बाधितांचा वाढता आकडा हा चिंतेला कारण ठरत आहे. कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा सतर्क झालीय. मुख्यमंत्री शिंदे यांनी संभाव्य धोका लक्षात घेता नुकतंच आरोग्य विभागाचा आढावा घेतला होता. शासनाचे त्यानुसार  कामकाजही सुरु आहे.
नव्या व्हेरिएंटमुळे खळबळ उडाली...
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे खळबळ उडाली आहे. या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण महाराष्ट्रातही  सापडत आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने दिवसभरातील नव्या बाधित रुग्णांची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात आज कोरोनाचे 146 नवीन रुग्ण आढळले आहेत. तसेच गेल्या 24 तासात 129 रुग्ण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती समोर आली आहे.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.17 टक्के आहे. तर सध्या राज्यातील मत्यृदर हा 1.81टक्के एवढा आहे. दरम्यान, राज्यात आज 14 हजार 379 कोव्हिडच्या चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी RT-PCR च्या 2 हजार 542 चाचण्या झाल्या आहेत. तसेत RAT च्या 11 हजार 837 चाचण्या झाल्या  आहेत.

नव्या व्हेरिएंटचे महाराष्ट्रात 110 रुग्ण..
कोरोनाचा नवीन व्हेरिएंट राज्यात हातपाय पसरत आहे. या व्हेरिएंटचे रुग्णही वाढत आहेत. राज्यात आतापर्यंत या विषाणूचे 110 रुग्ण आहेत. राज्यात कोरोनाच्या जेएन.1 या नव्या व्हेरिएंटने बाधित असेलेला पहिला रुग्ण 21 डिसेंबरला सिंधुदुर्ग येथील 41 वर्षीय व्यक्तीमध्ये आढळून आला होता. यानंतर आरोग्य विभागाने राज्यभरातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना चाचणी आणि जीनोम अनुक्रम वाढविण्यास सांगितले आहे.

राज्यात कोरोनाचे  914 रुग्ण सक्रिय

राज्यात सध्या कोव्हिडचे 914 रुग्ण सक्रिय आहेत. या रुग्णांमधील 870 रुग्णांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर 44 रुग्ण हे रुग्णालयात दाखल आहेत. यामध्ये 32 रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. तर 12 रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

शिरूर तालुक्यात पहाटे ३ ठिकाणी बिबटे जेरबंद - वनपरिक्षेत्र अधिकारी निलकंठ गव्हाणे यांची माहिती ७ नवीन पिंजरे शिरूर विभागासाठी दाखल  शिरूर तालुक्यात पहाटे ३ ठिकाणी बिबटे जेरबंद - वनपरिक्षेत्र अधिकारी निलकंठ गव्हाणे यांची माहिती ७ नवीन पिंजरे शिरूर विभागासाठी दाखल 
आधुनिक केसरी न्यूज कवठे येमाई : दि. ०४ शिरूर तालुक्यात सध्या अनेक ठिकाणी ऊस तोड सुरू असून बिबट्यांचे शेतकऱ्यांसह नागरिकांना...
सततची नापिकी आणि बँक कर्जाच्या ताणातून शेतकऱ्याची आत्महत्या
नागपूर निकालाच्या खंडपीठावर विजय वडेट्टीवार यांची तिखट प्रतिक्रिया..! 
लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे, जिल्हाधिकारी
देवाभाऊ" साठी ठाण्यात शिवप्रतिमेचा अवमान ! काँग्रेसने पोलखोल करीत केली कडक कारवाईची मागणी
किनवट नगर परिषद निवडणूकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज
मीच तुमचा लाडका भाऊ म्हणत पैठणमधे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी दिले बहीणीला  लखपती करण्याचे अश्वासन