वरोड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा थरार ; बनावट दारूसह १२ लाखांच्या मुद्देमाल जप्त

वरोड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा थरार ; बनावट दारूसह १२ लाखांच्या मुद्देमाल जप्त

आधुनिक केसरी न्यूज 

​वरोडा : शहरात अवैध धंद्यांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने आतापर्यंतची सर्वात मोठी व आक्रमक कारवाई केली आहे. बोर्डा चौक परिसरात १३ मार्चच्या मध्यरात्री फिल्मी स्टाईलने सापळा रचून बनावट देशी दारूची वाहतूक करणारी स्कॉर्पिओ गाडी पकडली असून बनावट मद्यासह एकूण १२ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईने दारू माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.


​ एक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ क्रमांक MH-34-CD-3336 बनावट देशी दारूचा साठा घेऊन बोर्डा ते राधा मिलन मंगल कार्यालय रोडवरून जाणार असल्याची गुप्त माहिती वरोडा राज्य उत्पादन शुल्क विभागाला प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाने १३ मार्च रोज शुक्रवारला रात्री ११:३० च्या सुमारास बोर्डा चौकात सापळा रचला. संशयास्पद गाडी येताच पथकाने तिला घेराव घालून तपासणी केली असता, त्यात नामांकित ‘रॉकेट देशी दारू संत्रा’ कंपनीचे हुबेहूब लेबल असलेले बनावट दारूचे ५० बॉक्स (एकूण ५००० नग) आढळून आले. या बनावट दारूची किंमत अंदाजे २ लाख रुपये असून गुन्ह्यात वापरलेली १० लाख रुपयांची स्कॉर्पिओ असा एकूण १२,१९,०००/- रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जागेवरच जप्त केला.

​या प्रकरणी आशिष रमेश मीटपल्लीवार (वय २३ वर्ष, रा. बोर्डा, वरोडा) याला जागीच ताब्यात घेऊन त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ आणि भारतीय न्याय संहिता १२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख आणि जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक प्रवीण मोहतकर ,दुय्यम निरीक्षक सचिन पोलेवार, सागर दीडशे, प्रमोद रजोते, हर्षराज इंगळे, विलास महाकुलकार, जितेंद्र आनंद, जगदीश मस्के, मंगेश कुलटे, अमोल भोयर ,किशोर पेजुरवार, शुभम गोवारदिपे यांचा समावेश होता. सदर कारवाईमुळे शहरात छुप्या पद्धतीने चालणाऱ्या अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे या प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक सचिन पोलेवार करत असून  अवैध दारू विक्रीचे रॅकेट कोणापर्यंत पोहोचवतात याकडे लक्ष लागले.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

वरोड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा थरार ; बनावट दारूसह १२ लाखांच्या मुद्देमाल जप्त वरोड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा थरार ; बनावट दारूसह १२ लाखांच्या मुद्देमाल जप्त
आधुनिक केसरी न्यूज ​वरोडा : शहरात अवैध धंद्यांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने आतापर्यंतची सर्वात मोठी व आक्रमक कारवाई केली आहे....
अफवांमुळे एचपीव्ही लसीकरणाकडे पालकांची पाठ; जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जयश्री भुसारे यांची वाकुळणी येथे तपासणी
मोहफूल वेचणाऱ्या बालकावर अस्वलाचा हल्ला 
एम जी एम काॅलेज येथील सेवा निवृत्त सेवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
घरगुती एलपीजी गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी जिल्ह्यात तपासण्या; संबंधित यंत्रणांना जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नतीबाबत दोन महिन्यांत निर्णय घ्या; ‘मॅट’चा आदेश
लग्न लावून परत येत असलेला वराती बसला अपघात.... सगळे वराती बस मधील साखर झोपेत असताना झाला अपघात..!