अफवांमुळे एचपीव्ही लसीकरणाकडे पालकांची पाठ; जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जयश्री भुसारे यांची वाकुळणी येथे तपासणी

अफवांमुळे एचपीव्ही लसीकरणाकडे पालकांची पाठ; जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जयश्री भुसारे यांची वाकुळणी येथे तपासणी

आधुनिक केसरी 

सोपान कोळकर 

बदनापूर : (ता.१३)तालुक्यातील वाकुळणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जयश्री भुसारे यांनी अचानक भेट देऊन विविध आरोग्य कार्यक्रमांचा आढावा घेतला. या भेटीदरम्यान १४ वर्षे पूर्ण व १५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींसाठी आयोजित करण्यात आलेल्या HPV लसीकरण मोहिमेला पालकांचा प्रतिसाद मिळाला नसल्याचे निदर्शनास आले.

आरोग्य केंद्रात मुलींच्या लसीकरणासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते. आशा कार्यकर्त्या तसेच आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन पालकांना माहितीही दिली होती. मात्र यानंतरही एकाही पालकांनी आपल्या मुलींना लसीकरणासाठी आणले नसल्याचे समोर आले.

यावेळी डॉ.भुसारे यांनी सांगितले की, HPV(ह्युमन पॅपिलोमा व्हायरस)लस ही स्त्रियांमध्ये होणाऱ्या गर्भाशयाच्या कर्करोगापासून संरक्षण देणारी महत्त्वाची लस असून ती पूर्णपणे सुरक्षित आणि मोफत आहे. ही गर्भाशय ग्रीवेचा (cervical) कर्करोग आणि इतर ६ प्रकारच्या कर्करोगांपासून संरक्षण करते. अत्यंत प्रभावी लस असून यापूर्वी अनेक मुलींना ही लस देण्यात आलेली आहे.समाजमाध्यमांवर पसरत असलेल्या अफवांवर पालकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.

भेटीदरम्यान त्यांनी आरोग्य केंद्राच्या प्रगतीपथावर असलेल्या नवीन इमारतीची पाहणी केली. तसेच उपस्थित वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून NCD, RCH, NTEP, NLEP, NVBDCP अशा विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा आढावा घेतला व त्यासंदर्भातील समस्याही  जाणून घेतल्या.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्नील जाधव, आरोग्य निरीक्षक आर.के.मंडाळ, समुदाय अधिकारी प्रगती निर्मळ, झेड.एम. पठाण, आरोग्य सहायिका जिजाबाई पवार, औषध निर्माण अधिकारी संदीप इंगेवाड, योगेश नांद्रेकर, मयूर साडेगावकर, दादाराव कदम, मनिषा आढावे, अनिता दुधाने, जगन्नाथ बोरुडे, नारायण आदी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

वरोड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा थरार ; बनावट दारूसह १२ लाखांच्या मुद्देमाल जप्त वरोड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा थरार ; बनावट दारूसह १२ लाखांच्या मुद्देमाल जप्त
आधुनिक केसरी न्यूज ​वरोडा : शहरात अवैध धंद्यांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने आतापर्यंतची सर्वात मोठी व आक्रमक कारवाई केली आहे....
अफवांमुळे एचपीव्ही लसीकरणाकडे पालकांची पाठ; जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जयश्री भुसारे यांची वाकुळणी येथे तपासणी
मोहफूल वेचणाऱ्या बालकावर अस्वलाचा हल्ला 
एम जी एम काॅलेज येथील सेवा निवृत्त सेवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
घरगुती एलपीजी गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी जिल्ह्यात तपासण्या; संबंधित यंत्रणांना जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नतीबाबत दोन महिन्यांत निर्णय घ्या; ‘मॅट’चा आदेश
लग्न लावून परत येत असलेला वराती बसला अपघात.... सगळे वराती बस मधील साखर झोपेत असताना झाला अपघात..!