उमाप यांच्या पथकांची माळकौठा येथील वाळू घाटावर धाड १ कोटी ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त 

उमाप यांच्या पथकांची माळकौठा येथील वाळू घाटावर धाड १ कोटी ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त 

आधुनिक केसरी न्यूज 

नांदेड : मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथील गोदावरी नदीच्या पात्रातून अवैध वाळू उत्खनन करणार्या वाळू घाटावर विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकांनी ६ मार्च रोजी रात्री उशिरा धाड टाकली आहे. या कारवाईत पथकाने १ कोटी ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून मुदखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांना मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथील गोदावरी नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा करण्यात येत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी त्यांच्या कार्यालयातील विशेष पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते. सदर पथकाने ६ मार्च रोजी रात्री ९ वाजून ३० मिनिटांनी माळकौठा येथील गोदावरी नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा सुरू असताना  धाड टाकली. उमाप यांच्या पथकाने माळकौठा येथील वाळू धक्कयांवर कारवाई करत टाटा कंपनीचे 2 हायवा, एक जेसीबी मशीन यासह, एक लोखंडी हॉपर, एक छोटी बोट व नदीपात्रातून बाहेर काढून ठेवलेली 50 ब्रास वाळू, असा एकूण 1 कोटी 4 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  प्रकरणात मुदखेड पोलीस ठाण्यात  गुरनं 39/2026 कलम 303 (2), 3(5), 48(7), 48(8) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणांचा तपास मुदखेड पोलीस ठाणे येथील पोलिस उपनिरीक्षक शिंदे हे करीत आहेत.सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांचेसह पोलिस कर्मचारी प्रदिप खानसोळे, संजीव जिंकलवाड, गणेश धुमाळ, कामाजी गवळी यांनी केली आहे. पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी व अंमलदारांना प्रशंसापत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

भीम जयंती मिरवणुकीत वाहन घुसल्याने एकाचा मृत्यू.एक जखमी भोकर येथील घटणा भीम जयंती मिरवणुकीत वाहन घुसल्याने एकाचा मृत्यू.एक जखमी भोकर येथील घटणा
आधुनिक केसरी न्यूज  भोकर :  रविवारी ( ता.२६) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली होती.रात्री ९...
​गोंदियात उपवर्गीकरणा विरोधात भीमगर्जना, बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करण्या
तिहेरी खुन प्रकरणातील मुख्य सुत्रधार साई गँगचा सुत्रधार, साई उर्फ साईलाला गहेरवार व  नितेश इंगळे यास वाराणसीत अटक 
Breking News : भ्रष्टाचारी चार आयएएस अधिकाऱ्यांचे प्रकरण उघड करणार : नाना पटोले 
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राजमाता राणी हिराई सोहळ्याला गालबोट लावले ; आदिवासी समाजाच्या वतीने तीव्र निषेध
हडसणी फाट्यावर भीषण अपघात, भरधाव कारने दोन दुचाकींना उडवले ४ जण ठार : एकाची प्रकृती चिंताजनक
महिला आरक्षणावर खुल्या चर्चेस काँग्रेस तयार; मुख्यमंत्र्यांनी सांगावे कधी व कुठे चर्चा करायची? मोदींनाही चर्चेला बोलवा: खा. प्रणिती शिंदे