खाजगी वसतीगृहातील मुलीची गळफास लावून आत्महत्या; मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यास मुलींच्या नातेवाइकांचा नकार
आधुनिक केसरी न्यूज
नांदेड : शहरातील हडको परिसरातील शामराव कदम होमिओपॅथिक कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 6 मार्च रोजी दुपारी उघडकीस आली असून सिडको ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सदर प्रकरणात वसतीगृह चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी वसतीगृहचालकावर गंभीर आरोप केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या नांदेड तालुक्यातील वाजेगाव येथील आकांक्षा मुंजाजी गायकवाड या युवतीने हडको भागातील शामराव कदम होमिओपॅथिक कॉलेजशी संबंधित वस्तीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे . 6 मार्च रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. दरम्यान, मयत विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी वस्तीगृह चालकाकडून होत असलेल्या मानसिक त्रासामुळेच आकांक्षाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
संबंधित वस्तीगृहाचे चालक जीवन घोगरे पाटील असून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. विद्यार्थिनीच्या मोबाईलमध्ये काही ऑडिओ संदेश असल्याचा दावा नातेवाईकांनी केला असून त्यामध्ये अपमानास्पद व अश्लील शब्दांचा वापर केल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात संबंधित वस्तीगृह चालकांविरोधात गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी नातेवाईक व स्थानिकांकडून करण्यात येत आहे. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे पोलिसांसमोर नवीन पेच निर्माण झाला आहे. या घटनेची सखोल चौकशी करून सत्य बाहेर यावे, अशी मागणी नागरिकांकडू व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List