दुबईत अडकलेल्या बुरेवार कुटुंबाला मदतीचा हात; अखेर मुंबईत सुखरूप आगमन

समाजसेवक उदय धकाते यांच्या पुढाकाराने स्थानिक संपर्कातून दुबईत वास्तव्य विलास चांदेकर यांचे धीर व सहकार्य

दुबईत अडकलेल्या बुरेवार कुटुंबाला मदतीचा हात; अखेर मुंबईत सुखरूप आगमन

आधुनिक केसरी न्यूज 

 चंद्रकांत पतरंगे 

गडचिरोली : आखाती देशांतील तणावपूर्ण परिस्थितीमुळे दुबई येथे अडकलेल्या गडचिरोलीतील बुरेवार कुटुंबाला स्थानिक पातळीवर मिळालेल्या मदतीमुळे अखेर सुखरूप मायदेशी परतता आले. काही दिवसांच्या अनिश्चिततेनंतर मुंबई येथे सुरक्षित पोहोचल्याची माहिती मिळताच त्यांच्या नातेवाईकांसह मित्रपरिवाराने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. शहरातील मुख्य चौकातील हॉटेल रसिकाचे संचालक सुनील बुरेवार हे कुटुंबासह पर्यटनासाठी दुबईला गेले होते. मात्र मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवेतील अडथळ्यांमुळे त्यांना तेथेच थांबावे लागले. परतीचा मार्ग अनिश्चित झाल्याने त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे मदतीची विनंती केली होती. ही बाब समाजमाध्यमांवरून समोर येताच गडचिरोलीतील समाजसेवक उदय धकाते यांनी तातडीने हालचाल सुरू केली. धकाते यांनी गेली वीस वर्षे दुबईत वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिक विलास चांदेकर यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. चांदेकर यांनी तातडीने प्रयत्न करत बुरेवार कुटुंबाशी संपर्क प्रस्थापित केला. रात्री उशिरा नील बुरेवार यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून कुटुंब सुरक्षित असल्याची खात्री झाली. त्यानंतर चांदेकर यांनी संबंधित हॉटेलमध्ये जाऊन सुनील बुरेवार व त्यांच्या कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांनी कुटुंबाला मानसिक धीर देत आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. त्या वेळी युद्धसदृश परिस्थितीमुळे विमानसेवा विस्कळीत असली तरी योग्य संधी मिळताच परतीचा प्रयत्न करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. अखेर काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर विमानसेवा उपलब्ध होताच बुरेवार कुटुंबाने परतीचा प्रवास सुरू केला आणि ते सुखरूपपणे मुंबईत पोहोचले. त्यांच्या सुरक्षित आगमनाची माहिती मिळताच गडचिरोलीतील नातेवाईकांनी आणि मित्रपरिवाराने समाधान व्यक्त केले.

या संपूर्ण घडामोडीत स्थानिक पातळीवर उभ्या राहिलेल्या संपर्कसाखळीने महत्त्वाची भूमिका बजावली. दोन वर्षांपूर्वी गडचिरोलीतील जिल्हा परिषद शासकीय हायस्कूलच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन उदय धकाते यांनी माजी शाळानायक म्हणून केले होते. त्या कार्यक्रमात देश-विदेशातील सुमारे दीड हजार माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. त्याच ओळखीच्या माध्यमातून विलास चांदेकर यांच्याशी संपर्क प्रस्थापित झाला होता. विशेष म्हणजे बुरेवार आणि चांदेकर हे दोघेही त्याच शाळेचे माजी विद्यार्थी असून दुबईतील भेटीत ते एकाच गावातील व शेजारी असल्याचेही समोर आले.
परदेशात अडचणीत सापडलेल्या गडचिरोलीतील कुटुंबाला वेळेवर मदतीचा हात मिळाल्याने समाजात समाधान व्यक्त होत आहे. संकटाच्या क्षणी पुढाकार घेऊन मदत उभी करणाऱ्या उदय धकाते आणि प्रत्यक्ष मदतीसाठी धावून आलेल्या विलास चांदेकर यांचे बुरेवार कुटुंबासह नागरिकांनी आभार मानले आहेत. संकटसमयी उभे राहिलेले हे सहकार्य गडचिरोलीतील माणुसकीचे जिवंत उदाहरण ठरले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

भीम जयंती मिरवणुकीत वाहन घुसल्याने एकाचा मृत्यू.एक जखमी भोकर येथील घटणा भीम जयंती मिरवणुकीत वाहन घुसल्याने एकाचा मृत्यू.एक जखमी भोकर येथील घटणा
आधुनिक केसरी न्यूज  भोकर :  रविवारी ( ता.२६) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली होती.रात्री ९...
​गोंदियात उपवर्गीकरणा विरोधात भीमगर्जना, बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करण्या
तिहेरी खुन प्रकरणातील मुख्य सुत्रधार साई गँगचा सुत्रधार, साई उर्फ साईलाला गहेरवार व  नितेश इंगळे यास वाराणसीत अटक 
Breking News : भ्रष्टाचारी चार आयएएस अधिकाऱ्यांचे प्रकरण उघड करणार : नाना पटोले 
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राजमाता राणी हिराई सोहळ्याला गालबोट लावले ; आदिवासी समाजाच्या वतीने तीव्र निषेध
हडसणी फाट्यावर भीषण अपघात, भरधाव कारने दोन दुचाकींना उडवले ४ जण ठार : एकाची प्रकृती चिंताजनक
महिला आरक्षणावर खुल्या चर्चेस काँग्रेस तयार; मुख्यमंत्र्यांनी सांगावे कधी व कुठे चर्चा करायची? मोदींनाही चर्चेला बोलवा: खा. प्रणिती शिंदे