न.प निवडणूकीत आता २० डिसेंबर रोजी मतदान नि.आयोगाच्या आदेशानंतर निवडणूक प्रचाराला विश्रांती
On
आधुनिक केसरी न्यूज
देऊळगाव राजा : निवडणूक आयोगाच्या एका निर्देशानंतर आज (ता. ३०)देऊळगाव राजा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूकीला विश्रांती मिळाली असून येत्या दोन डिसेंबर रोजी होणारी मतदान प्रक्रिया आता १० डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे.
नामांकन अर्ज संदर्भात एका महिलेने जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केलेल्या अपिलाच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने सदर आदेश पारित केले असून नवीन आदेशानुसार १० डिसेंबर रोजी नामांकन अर्ज परत, २० डिसेंबर रोजी मतदान तर २१ डिसेंबर रोजी मतमोजणी घेण्याचे निर्देश आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे नगराध्यक्ष पदाच्या तीन उमेदवारा सह २१ नगरसेवक पदासाठी निवडणूक प्रचारात मग्न असलेल्या एकूण ७७ उमेदवाराला मनस्ताप सहन करावा लागला आहे. याचबरोबर उमेदवारांसह असंख्य कार्यकर्त्यांच्या उत्साहावर विरजण पडले आहे.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
02 Mar 2026 13:15:00
आधुनिक केसरी न्यूज कुडूत्री : राज्य शासनाच्या वीस पटाखालील शाळा बंदच्या निर्णयाच्या विरोधात महाविकास आघाडी, विविध संघटना व पालक यांच्या...

Comment List