डॉ. नंदकिशोर खत्री “जीवनसाधना गौरव” पूरस्काराने सन्मानित
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : स्थानिक ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित डॉ. खत्री महाविद्यालय, तुकूम, चंद्रपूर चे संस्थापक अध्यक्ष डॉ. नंदकिशोर हरिलाल खत्री यांना गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली “जीवनसाधना गौरव-२०२५” ने सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. खत्री सर यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान मोलाचे आहे. चंद्रपूर व सावली येथील भागात शिक्षण संस्था काढून त्यांनी ग्रामीण, गोरगरीब व आदीवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. शिक्षण क्षेत्रात नावारूपाला आलेली गणमान्य व्यक्ती आहे. डॉ. खत्री सरांचा गौरव गोंडवाना विद्यापीठाकडून १४ व्या वर्धापण दिन सोहळयात दिनांक ०६ ऑक्टोबर, २०२५ रोजी विद्यापीठाचे नविन सांस्कृतिक भवनात होणार आहे. महाविद्यालयासाठी ही आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे. ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर चे सचिव, कोषाध्यक्षा तसेच सर्व सन्माननिय पदाधिकारी, डॉ. खत्री महाविद्यालयाचे प्राचार्य, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सरांचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List