बिलोलीच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयावर काॅग्रेसचा जन आक्रोश मोर्चा विविध मागण्यांचे प्रशासनाला निवेदन 

बिलोलीच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयावर काॅग्रेसचा जन आक्रोश मोर्चा विविध मागण्यांचे प्रशासनाला निवेदन 

आधुनिक केसरी न्यूज

बिलोली : बिलोली तालुका व शहर काँग्रेस कमिटी च्या वतीने विविध मागण्यांचा जन आक्रोश मोर्चा  दि. ९ मे रोजी सोमवारी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.शेकडो काँग्रेस समर्थक कार्यकर्त्यांनी  सरकारविरोधी घोषणाबाजी करून शहर दणानूण  सोडले. बिलोली तालुका व शहर काँग्रेस कमिटी च्या वतीने शहरातील उपजिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा आयोजित केला होता. हा जन आक्रोश मोर्चा  शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निघुन  जुन्या बसस्थानकाजवळ असलेल्या उपजिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला.त्या नंतर या मोर्चाचे रुपांतर जाहीर सभेत झाले.तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिंपळीकर, पक्षाचे प्रवक्ते दिलीप पांढरे वालिओद्दीन फारुखी, माजी उपाध्यक्ष मारोती पटाईत, माजी उपसभापती शंकर यंकम, नगरसेवक प्रकाश पोवाडे, नगर सेवक अमजद चाऊस, शिवा पाटील ,भिमशक्तीचे तालुका प्रमुख गंगाधर सोनकांबळे,शिवा गायकवाड आदी  नेत्यांनी   मोर्चामध्ये भाषणातून भाजप सरकार च्या धोरणावर सडकून टीका केली.या वेळी प्रमुख उपस्थिती इम्रान पटेल युवक काॅग्रेस महाराष्ट्र सरचिटणीस, श्रीनिवास जाधव, संदीप कटारे,शेख नवाब यांची  होती .यावेळी मोर्चेकरांच्या वतीने प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले सदरील निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या. बिलोली शहराला बारामाही स्वच्छ पाणीपुरवठा करणे, शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत करणे,   टोल नाका ते बडी मस्जिद अंतर्गत  रोड दुभाजकांचे लाईट चालू करने, निराधार अपंग श्रावण बाळ लाभधारकांना दर महिन्याला वेळेवर अनुदान वाटप  करणे, क्रिडा संकुलाचे अर्धवट काम पूर्ण करणे, संपूर्ण शहर स्वच्छता दर्जेदार करणे,शहरातील रोड वरील जे छोटे मोठे टपरीधारक दुकानदार आहेत त्यांचे पुनर्वसन करणे, ,शहरातील  दोन पिढी  पासून गायरान जमीनीवर राहणाऱ्या लोकांना ती जागा त्यांच्या नावे करून बेघर लोकांसाठी प्रधानमंत्री  घरकुल योजना राबविण्यात यावी, शहरातील रस्ते दर्जेदार तयार करण्यात यावे
आदी शहरातील विविध मुलभूत गरजा च्या मागणीसाठी हा मोर्चा निघाला होता या मोर्चात  शेकडो नागरिक मोर्चात सहभागी झाले होते.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

वरोड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा थरार ; बनावट दारूसह १२ लाखांच्या मुद्देमाल जप्त वरोड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा थरार ; बनावट दारूसह १२ लाखांच्या मुद्देमाल जप्त
आधुनिक केसरी न्यूज ​वरोडा : शहरात अवैध धंद्यांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने आतापर्यंतची सर्वात मोठी व आक्रमक कारवाई केली आहे....
अफवांमुळे एचपीव्ही लसीकरणाकडे पालकांची पाठ; जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जयश्री भुसारे यांची वाकुळणी येथे तपासणी
मोहफूल वेचणाऱ्या बालकावर अस्वलाचा हल्ला 
एम जी एम काॅलेज येथील सेवा निवृत्त सेवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
घरगुती एलपीजी गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी जिल्ह्यात तपासण्या; संबंधित यंत्रणांना जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नतीबाबत दोन महिन्यांत निर्णय घ्या; ‘मॅट’चा आदेश
लग्न लावून परत येत असलेला वराती बसला अपघात.... सगळे वराती बस मधील साखर झोपेत असताना झाला अपघात..!