डॉ.माधवी खोडे चवरे यांनी स्वीकारला कुलगुरू पदाचा प्रभार

डॉ.माधवी खोडे चवरे यांनी स्वीकारला कुलगुरू पदाचा प्रभार

आधुनिक केसरी न्यूज

नागपूर : १३ रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा प्रभार अपर विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे चवरे यांनी गुरुवार, दि. १३ मार्च २०२५ रोजी स्वीकारला. जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील कुलगुरू कक्षात प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे यांच्याकडून डॉ. माधवी खोडे चवरे यांनी कुलगुरू पदाचा प्रभार स्वीकारला. कुलगुरू पदाचा प्रभार स्वीकारल्यानंतर डॉ. माधवी खोडे चवरे यांनी वेळेवर परीक्षा घेत तातडीने निकाल घोषित केले जाणार असल्याची माहिती दिली. उन्हाळी २०२५ दरम्यान एक हजार पेक्षा अधिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेतल्या जाणार असून याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. विद्यापीठाचे प्रशासकीय कार्य विद्यार्थी केंद्रित असावे, अशा देखील त्या म्हणाल्या. यावेळी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. राजेंद्र काकडे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, वित्त व लेखा अधिकारी श्री हरीश पालीवाल, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. प्रशांत माहेश्वरी, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. संजय कवीश्वर, मानव विज्ञान विद्याशाखा डॉ. शामराव कोरेटी, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. प्रशांत कडू, राज्यपालनामित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. समय बनसोड, श्री अजय चव्हाण, प्राचार्य डॉ. रविशंकर मोर, आयआयएल संचालक डॉ. निशिकांत राऊत यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

हजारो समर्थकांच्या उपस्थितीत लोकनेता सुरेशकुमार जेथलिया यांना साश्रू नयण्णांनी अखेरचा निरोप..! हजारो समर्थकांच्या उपस्थितीत लोकनेता सुरेशकुमार जेथलिया यांना साश्रू नयण्णांनी अखेरचा निरोप..!
आधुनिक केसरी न्यूज     केदार शर्मा    परतूर : विधानसभेचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुरेश कुमार जेथलिया...
लोहगाव पोलीस ठाण्यातील PSI ला ८० हजारांची लाच घेताना ACB कडून रंगेहात अटक
भीम जयंती मिरवणुकीत वाहन घुसल्याने एकाचा मृत्यू.एक जखमी भोकर येथील घटणा
​गोंदियात उपवर्गीकरणा विरोधात भीमगर्जना, बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करण्या
तिहेरी खुन प्रकरणातील मुख्य सुत्रधार साई गँगचा सुत्रधार, साई उर्फ साईलाला गहेरवार व  नितेश इंगळे यास वाराणसीत अटक 
Breking News : भ्रष्टाचारी चार आयएएस अधिकाऱ्यांचे प्रकरण उघड करणार : नाना पटोले 
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राजमाता राणी हिराई सोहळ्याला गालबोट लावले ; आदिवासी समाजाच्या वतीने तीव्र निषेध