रय्यतवारी कॉलरीत भूस्खलनामुळे झालेल्या अपघाताची आमदार किशोर जोरगेवार यांनी केली पाहणी

पिडीत कुटुंबाला केली मदत, प्रशासनाल दिल्या आवश्यक सूचना

रय्यतवारी कॉलरीत भूस्खलनामुळे झालेल्या अपघाताची आमदार किशोर जोरगेवार यांनी केली पाहणी

आधुनिक केसरी न्यूज 

चंद्रपूर : रय्यतवारी कॉलरी भागात अचानक भूस्खलन झाल्याने एका कुटुंबावर संकट कोसळले आहे. दोन दिवस बाहेरगावी राहून घरी परतलेल्या शिवणकर कुटुंबाच्या घरात २० फूट खोल खड्डा पडल्याची धक्कादायक घटना आज दुपारच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत प्रशासनाला आवश्यक सूचना केल्या आहे.

यावेळी तहसीलदार विजय पवार, सहायक आयुक्त सचिन माकोडे, रामनगर ठाणेदार सुनिल गाडे,अजय जैस्वाल, यंग चांदा ब्रिगेडचे चंद्रराज बाथो, राजेश अडुर आणि वेकोलिच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

घरातील सुनिता नामक महिला दरवाजा उघडताच अचानक खड्ड्यात पडली. स्थानिकांनी तात्काळ मदत करत शिडीच्या सहाय्याने तिला बाहेर काढले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. परंतु, शिवणकर कुटुंबावर ही घटना अत्यंत भीषण असल्याने त्यांना तातडीने मदत पुरवण्यात आली. गेले दहा दिवस चंद्रपूर शहर -जिल्ह्यात होणारी अतिवृष्टी व कोळसा खाणीमुळे पोकळ झालेला भूभाग यामुळे हा प्रकार घडला असल्याची प्राथमिक माहिती आहे. घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या भागातील सुरक्षितता तपासण्यासाठी आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी वेकोली प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सुचना आमदार जोरगेवार यांनी दिल्या.शिवणकर कुटुंबाच्या राहण्याची सोय वेकोलि वसाहतीत करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. मनपा प्रशासनाने तातडीने पिडीत कुटुंबाला मदत करावी आणि या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशीही सूचना आमदारांनी केली आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

वडिलांच्या अंत्यविधीला गेल्यावर रडताना लेकीचा हार्ट अटॅकने मृत्यू परिसरात हळहळ वडिलांच्या अंत्यविधीला गेल्यावर रडताना लेकीचा हार्ट अटॅकने मृत्यू परिसरात हळहळ
आधुनिक केसरी न्यूज दिनेश कांबळे पलूस : मृत्यू कुणाला कधी कसा येईल हे सांगता येणार नाही अशीच एक ह्रदयद्रावक घटना...
कितीही सांगा, आम्ही फसणारच! सोलापुरातील ६९ वर्षीय भूसार व्यापाऱ्याला सायबर गुन्हेगारांकडून ४१ लाख रुपयाचा गंडा; ‘  
अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही : हर्षवर्धन सपकाळ
मिरज शासकीय वैद्यकीय रुग्णालयात गुन्हेगारावर फिल्मी स्टाईल गोळीबाराचा प्रयत्न; पोलिसांची सतर्कता आणि अनर्थ टळला 
नांदेडच्या वडेपुरी शिवारात बिबट्याचा वावर; गावकऱ्यांसह शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
एसटीच्या परतवाडा आगाराचे  मद्यपी व्यवस्थापक निलंबित सुलक्षा व दक्षता विभागाची कारवाई
वाळू माफियांचे धाबे दणाणले, सायगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर बदनापूर पोलिस आणि महसूल विभागाची मोठी कारवाई