जन्मदात्या वडिलांना नराधम मुलाने जिवंत जाळले ;बाळापूर येथील धक्कादायक घटना...

जन्मदात्या वडिलांना नराधम मुलाने जिवंत जाळले ;बाळापूर येथील धक्कादायक घटना...

आधुनिक केसरी न्यूज 

अकोला : जन्मदात्या वडिलांनाच नराधम मुलाने जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील लोटणापूर येथे घडला. दारू पिऊन आलेल्या मुलाने खाटेवर आजारी असलेल्या वडिलांशी वाद घातला. रागाच्या भरात आजारी वडिलांनाच आग लावली. अर्धांगवायूच्या झटक्यामुळे आजारी वडील स्वत:चा बचाव करू शकले नाही. गंभीररित्या भाजल्या गेलेल्या वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी बुधवारी आरोपी मुलावर हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

कलंकित मुलाची घटना बाळापूर तालुक्यातून समोर आली. आपल्या जन्मदात्या आजारी वडिलांविषयी कुठलीही सहानुभूती न बाळगता नराधम मुलाने त्यांना जिवंत जाळले. धनेगाव येथील अजाबराव बापूसा इंगळे (५५) हे पत्नी व तीन मुलांसह मोलमजुरी करून लोटणापूरमध्ये भाड्याच्या खोलीत राहत होते. काही दिवसांपूर्वी अजाबराव यांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यामुळे ते गंभीर आजारी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू होते. घरात ते खाटेवरच पडून राहत होते. १४ जुलै रोजी दुपारी त्यांचा दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा आकाश अजाबराव इंगळे (३०) हा घरात दारू पिऊन आला. आजारी वडिलांसोबत व्यसनाधीन मुलाचा वाद झाला. दोघांमधील वाद टोकाला गेला. व्यसनाधीन मुलाने रागाच्या भरात घरातील पेटलेल्या चुलीतील आग आजारी वडिलांच्या खाटेला खालून लावली. वडिलांना त्या आगीच्या झळांमध्ये सोडून देत तो घरातून निघून गेला. खाटेवरील कपड्यांमुळे आग भडकली. आजारपणामुळे शरीराची हालचाल करता येत नव्हती. त्यातच मदतीसाठी घरात कुणीच नसल्याने ते आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. या आगीमध्ये ते गंभीररित्या भाजल्या गेले.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

अशोक चव्हाणानी घेतली जखमीची भेट..! अशोक चव्हाणानी घेतली जखमीची भेट..!
आधुनिक केसरी न्यूज  भोकर : लगत  गुरुवारी (ता १०)झालेल्या भीषण अपघातात  सात जण ठार झाल्याची माहिती  माजी मुख्यमंत्री तथा खासदार...
ट्रक व मॅजिकची समोरासमोर धडक सहाजण ठार..!
भोकर लगत कार अपघातात तीनजण जखमी बलुनमुळे प्राण वाचले
मराठा कुणबी जात प्रमाणपत्र; बैलपोळा असूनही शिबिरांना गर्दी माहिती,नोंदी बघून अर्ज केले दाखल
तलवाडा येथे ड्राॅ पद्धतीने सोळा सन साजरा; भावलाल किटे यांना मिळाला मान..!
अण्णा हजारे यांच्या प्रकृतीची विचारपूस; तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची बॉम्बे हॉस्पिटलमध्ये भेट
MPSC च्या अनागोंदी कारभाराप्रकरणी अध्यक्ष व सचिवांची हकालपट्टी करा, अध्यक्ष मुख्यमंत्र्यांचा ‘खास’ असल्याने कारवाई करत नाही का?: हर्षवर्धन सपकाळ